Navratri Day 5 Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Day 5: आजच्या दिवशी स्कंदमाता देवीला कमळाचे फूल अर्पण करा, तुमच्या इच्छा- आकांक्षा होतील पूर्ण

Navratri Day 5 Skandamata Devi Puja: नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. पिवळा व पांढरा रंग शुभ मानला जातो. कमळाचे फूल अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते व मोक्षमार्ग सुकर होतो.

Manasvi Choudhary

आज नवरात्रीचा पाचवा दिवस सुरू आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अदिशक्ती देवीचे रूप माता स्कंदमाता देवीचे पूजा केली जाते. शास्त्रानुसार, माता स्कंदमाता भक्तांवर तिच्या स्वत:च्या मुलाप्रमाणे प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करते. आईची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि कामात यश प्राप्त करते. माता स्कंदमातेची पूजा केल्याने भक्ताला मोक्षाचा मार्गही सोपा होतो. भगवान स्कंद यांची आई आहे म्हणून तिला स्कंदमाता असे म्हणतात

माता स्कंदमाता सिंहावर विराजमान आहे. भगवान स्कंद त्यांच्या बालरूपात मातेच्या मांडीवर बसलेले आहे. भगवान स्कंद तिच्या उजव्या हातात धरलेले आहेत. आणि त्यांच्या खालच्या हातात कमळाचे फूल आहे. वरचा हात वरदमुद्रेत आहे

स्कंदमाता देवीची पूजा

सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा.

देवघरामध्ये गंगाजल शिंपडा त्यानंतर कुंकू, फुले, फळे, मिठाई, सुपारी, लवंग, वेलची आणि साजश्रृंगार अर्पण करा. देवीसमोर दिवा लावा आणि देवीची आरती करा.

देवीची पूजा झाल्यानंतर केळीची खीर, केळीची मिठाई किंवा केळीची खीर अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते.

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच आज पिवळा आणि पांढरा हे रंग शुभ मानले जातात.

माता स्कंदमातेला कमळाचे फूल आवडते. ती कमळाच्या फुलावर बसते म्हणून तिला पद्मासन असेही म्हणतात.

स्कंदमातेची पूजा करताना ओम ऐं ह्रीं क्लीम स्कंदमताय नम: आणि या देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रूपं संस्थिता| नमस्तेस्ये नमस्तेस्ये नमस्तेस्ये नमो नम:||

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EXIT POLL मध्ये महायुतीची सरशी; अंदाज जाहीर होताच रंगली राज ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या भविष्यवाणीची चर्चा

Friday Horoscope : मंदिरात जाऊन अन्नपदार्थ दान करावेत; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तरी घडणार

आयोगानं वापरलं शाईऐवजी मार्कर; मतदानाची शाई एका मिनिटात गायब

Municipal Election: केंद्रावर जाण्याआधीच दुसऱ्याच कुणी बोगस मतदान केलं; मतदाराला बॅलेटवर मतदानाची संधी, कुठे घडला प्रकार?

महापालिका निवडणुकांचं मतदान होताच ZP ची तयारी सुरु; राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या बड्या नेत्यांची गुप्त बैठक

SCROLL FOR NEXT