Navratri Havan Puja Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Havan Puja: अष्टमी आणि नवमीला घरी हवन कसे करतात? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् सोपी पद्धत

Navratri Havan AT Home Easy Method Shubh Muhurat: नवरात्रीत हवन कसे करतात? सोपी पद्धत, शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घ्या. कन्या पूजनासह हवन पूजेचे धार्मिक महत्त्व समजून घ्या.

Manasvi Choudhary

How To Do Navratri Havan At Home : २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली. आज 30 सप्टेंबर अष्टमी दिवस आहे. 1 ऑक्टोबर रोजी नवमी आहे. या दोन्ही दिवशी कन्यापूजन आणि हवन पूजा केले जाते. शारदीय नवरात्रीचे नऊ दिवसाचे व्रत हवन आणि कन्या पूजेशिवाय अपूर्ण मानले जाते. नवरात्रीत हवन करण्याची सोपी पद्धत, मंत्र आणि शुभ वेळ सविस्तरपणे जाणून घ्या.

ब्रह्म मुहूर्तावर सकाळी उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. हवनकुंड स्वच्छ करा नंतर हवनकुंड स्वच्छ ठिकाणी हवनासाठी स्थापित करा. पूजा सुरू करण्यापूर्वी भगवान गणेशाचे ध्यान करा.

गंगाजल शिंपडा आणि सर्व देवतांना आवाहन करा. आब्यांच्या लाकडाचा, तूपाचा आणि कापूरचा वापर करून हवनकुंडात अग्नी प्रज्वलित करा. त्यानंतर 'ओम अग्निय नम:स्वाहा' या मंत्राचा जप करून अग्नि देवाचे ध्यान करा. 'ओम गणेशाय नम: स्वाहा' हे मंत्राने पुढील अर्पण करा. त्यानंतर ग्रहांचे आणि कुलदेवतेचे ध्यान करा.

धार्मिक मान्यतेनुसार १०८ वेळा सर्व देवतांच्या नावाने अर्पण करा. देवीच्या नऊ रूपांचे ध्यान करताना अर्पण करा. शेवटी उरलेले हवन साहित्य एका सुपारीच्या पानावर गोळा करा त्यानंतर देवीची आरती करा आणि गोड नैवेद्य अर्पण करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 Grand Finale: फिनाले मधला चौथा स्पर्धक बाहेर; तान्या मित्तलची बिग बॉसच्या घरातून एक्झिट

Nashik Accident : सप्तश्रृंगी गडावरून कार दरीत कोसळली, ६ भाविकांचा मृत्यू

...तर त्या पक्षाचा सत्यानाश होतो; केंद्रीय मंत्री आठवलेंनी सांगितला ३५ वर्षांचा इतिहास

हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा होणार; १८ विधेयके मांडली जाणार, लाडकी बहीण योजनेवरही फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Bigg Boss 19: 'सलमान खानसोबत स्टेज शेअर करू नको...'; प्रसिद्ध अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई गँग कडून धमकी

SCROLL FOR NEXT