Navratri Puja Rules Saam Tv
लाईफस्टाईल

Navratri Puja Rules: नवरात्रीत मासिक पाळी आली तर पूजा करावी का? शास्त्रानुसार नेमकं काय सांगतं?

Navratri Periods Puja Rules:नवरात्रीत महिलांनी मासिक पाळीच्या काळात पूजा, उपवास करावा का? शास्त्र, परंपरा व आरोग्याच्या दृष्टीने नेमकं काय सांगितलं आहे ते जाणून घ्या.

Manasvi Choudhary

नवरात्री हा एक पवित्र सण आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या विविध रूपांची पूजा नवरात्रीत केली जाते. २२ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. १ ऑक्टोबर रोजी समाप्ती होणार आहे. नवरात्रीत नऊ दिवस उपवासाचे व्रत केले जाते. पारंपारिक पद्धतीने गरबा, भोंडला अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतात. नऊ दिवस देवीचा जागर केला जातो.

नवरात्रीत नऊ दिवस दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. कलश स्थापित केला जातो. अखंड दिवा लावला जातो. देवीची आरती केली जाते. स्त्रिया, मुलींसह, पुरूषमंडळी देखील नवरात्रीत उपवासाचे व्रत करतात. मात्र नऊ दिवसांत मासिक पाळी आल्यास पूजा करायची की नाही असा प्रश्न असतो? शास्त्रानुसार नेमका काय प्रथा आहे हे सविस्तर जाणून घेऊया.

शास्त्रानुसार, नवरात्रीत काही नियमांचे पालन केले जाते. मासिक पाळीदरम्यान पूजा करत नाही ही परंपरा आजही पाळली जाते.

गरूड पुराणानुसार, मासिक पाळीमध्ये महिलांनी आराम करावा कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ नये अशी प्रथा होती.

शास्त्रानुसार, मासिक पाळी दरम्यान महिलांनी मंदिर किवा यज्ञ विधींमध्ये सहभागी होऊ नये. तसेच मूर्तीला स्पर्श करू नये.

तसेच मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांनी मानसिकरित्या देव- देवतांचे स्मरण करू नये असे कुठेही म्हटलेले नाही. मंत्र, ध्यान धारणा महिला करू शकतात.

मासिक पाळीच्या वेळी महिलांना वेदना, थकवा आणि अशक्तपणा जाणवतो अशा वेळी उपवास करून शरीरावर परिणाम होऊ शकतो म्हणून नवरात्रीत मासिक पाळी आल्यास महिला उपवास, कोणतेही व्रत करत नाही.

टीप-

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prasad Oak: 'शंभर चित्रपटांचा टप्पा गाठणं...'; 'वडापाव'च्या निमित्ताने प्रसाद ओकच्या चित्रपटांची 'शतकपूर्ती', अभिनेता म्हणाला...

India Vs Pakistan Match: ठाणे येथील हॉटेलमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा, भारत-पाक मॅच सुरू असताना टीव्ही फोडले; पाहा VIDEO

'१० मिनिटांत तयार हो, तुझ्यासोबत शरीरसंबंध..' CMOकडून महिला डॉक्टरवर जबरदस्ती, शेवटी हार्ट अटॅकनं मृत्यू

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये बंजारा समाजाचा महाएल्गार मोर्चा

Navratri Upvas: नवरात्रीचा उपवास कधी सोडावा?

SCROLL FOR NEXT