Saam Tv
नवरात्रोत्सवाला ३ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरामध्ये घटस्थापना देखील केली जाते.
अनेक महिला नवरात्रोत्सवा निमित्त देवीचे उपवास करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का?
कन्यापूजन केल्या शिवाय नवरात्रीची उपासना यशस्वी होऊ शकत नाही. शारदीय नवरात्रीमध्ये कुमारीका मुलींची पूजा केली जाते.
कन्यापूजनाच्या दिवशी आपल्या परीसरातील ९ कुमारीका मुलींना घरी बोलवून त्यांचे पूजन केले जातं.
पूजन केल्यानंतर त्यांना श्रुगाराचे वाहान दिले जाते. या लहान मुलींना देवीचे ९ रुप मानले जाते.
कन्यापूजन तुम्ही अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी करु शकता. हे २ दिवस कन्यापूजनासाठी अत्यंत शुभ मानले जातात.
कन्यापूजन केल्यामुळे तुमच्यावर दुर्गादेवीची कृपादृष्टी कायम राहाते त्यासोबतच घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.