धुळ, माती आणि वाहनांचा धूर यांमुळे आपल्या त्वचेसह केसांवर सुद्धा गंभीर परिणाम होतात. केस इतके खराब होतात की, काही महिला माझ्या केसांचा झाडू तयार झाला आहे, असं म्हणतात. तुम्ही सुद्धा असं म्हणत असाल तर आम्ही तुमचे केस सॉफ्ट आणि सिल्की व्हावेत यासाठी एक रामबाण शाम्पू शोधला आहे.
साहित्य
तांदूळ - १ वाटी
मेथी दाणे - १ वाटी
डिंक - १ वाटी
रिठा - १ वाटी
पाणी - ५ ग्लास
कोरफड - ७ ते ८ इंच
कृती
सर्वात आधी एका वाटीत तांदूळ घ्या. त्यानंतर मेथी दाणे, डिंक आणि रिठा एकत्र सर्वकाही एकाच भांड्यात पाणी घालून भिजत ठेवा. सर्व पदार्थ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी यातील रिठा बाजूला काढून घ्या. त्यावर असलेली साल पाण्याने भिजल्याने निघण्यास सुरुवात होते. ही सर्व साल काढून घ्या. त्यानंतर रिठाच्या बिया पुन्हा एका भांड्यात पाणी उकळत ठेवा आणि या पाण्यात बिया शिजवून घ्या.
बिया मस्त शिजल्याकी बाहेर काढून थंड करून घ्या. त्यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी घेऊन सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्या. सर्व काही छान बारीक झाले की एका गाळणीच्या सहाय्याने काळून सुद्धा घ्या. त्यानंतर एका भांड्यात कोरफडीचा गर घ्या. गर सुद्धा मस्त पाण्यात शिजवून मिक्सरला फिरवून घ्या आणि या मिश्रणात मिक्स करा. तयार झाला तुमचा आयुर्वेदिक रामबाण शाम्पू.
घरच्याघरी बनवलेला हा शाम्पू आपल्या केसांना लावल्याने केस अगदी सॉफ्ट आणि सिल्की होतात. काही मुली केसांवर चुकीच्या पद्धातीने सुद्धा शाम्पू लावतात. त्यामुळे सुद्धा हेअरफॉल जास्त वाढत जातो. त्यामुळे आज शाम्पू लावण्याची योग्य पद्धत सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शाम्पू केसांना लावताना तो थेट केसांच्या मुळांवर अप्लाय करू नका. आधी एका वाटीत कोमट पाणी घ्या. त्यानंतर या पाण्यात शांम्पू मिक्स करा. केसांना शांम्पू लावताना अशा पद्धतीने तो अप्लाय करा. विशेष म्हणजे शाम्पू केसांसाठी असतो केसांच्या मुळांसाठी नाही. त्यामुळे शाम्पू फक्त केसांवर अप्लाय केला पाहिजे.