National Sports Day 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

National Sports Day 2023 : फक्त खेळच नाही तर या गोष्टींच्या माध्यमातुन क्रीडा क्षेत्रात करु शकता झक्कास करिअर, हे वाचुन आजमवा तुमचं नशीब

Career In Sports : दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस आपण दरवर्षी क्रीडा दिन म्हणून साजरा करतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

National Sports Day : दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस आपण दरवर्षी क्रीडा दिन म्हणून साजरा करतो. मेजर ध्यानचंद हे भारतीय फील्ड हॉकी संघाचे माजी खेळाडू आणि कर्णधार होते.

खेळणे हे प्रत्येकांचा आवडीचा विषय (Topic) आहे. आवडीचा असला की मग आपल्या त्या क्षेत्रात काम करण्याची मजाच वेगळी असते. स्पोर्ट्स डे 2023 च्या निमित्ताने खेळातही चांगले करिअर करता येते हे पाहूयात. तुम्‍हाला अशाच काही क्षेत्रांबद्दल सांगणार आहोत जिथं तुम्‍ही तुमचं करिअर सहज बनवू शकता.

खेळात करिअर करण्यासाठी हे गुण असले पाहिजे

  • शिस्त

  • कठीण परिश्रम

  • लक्ष केंद्रित

  • इंटरपर्सनल स्कील

  • निर्णय घेणे

  • शारीरिक क्षमता

या क्रीडा क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता

क्रीडा प्रशिक्षक -

क्रीडा प्रशिक्षक किंवा प्रशिक्षक अशी व्यक्ती आहे जी एखाद्या विशिष्ट खेळात (Game) लोकांना प्रशिक्षण आणि सूचना देते.

स्पोर्ट्स आणि फिटनेस न्यूट्रिशनिस्ट -

खेळाडूंना योग्य आहार सांगणे हे त्यांचे काम (Work) आहे, जेणेकरून खेळाडूंना स्टॅमिना आणि एनर्जीची कमतरता भासणार नाही आणि ते अधिक चांगली कामगिरी करत राहतील.

स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट -

स्पोर्ट्स फिजिओथेरपी प्रोफेशनल खेळाडूंना दुखापतीतून बरे होण्यास आणि कमी करण्यास मदत करतो. तो दुखापतीचे आकलन करतो आणि त्यानुसार थेरपी देतो.

स्पोर्ट्स मार्केटिंग मॅनेजर -

त्यांचे काम मुख्यत्वे खेळाची जाहिरात करणे आणि प्रोत्साहन देणे हे आहे. ते बाजारावर संशोधन करतात, अहवाल तयार करतात आणि त्यानुसार रणनीती बनवून काम करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: हातात पैसा टिकत नाहीये? करा हा १ उपाय, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

Maharashtra News Live Update: हिंगोलीत शेतकरी कर्जमाफीच्या जीआरची शेतकऱ्यांनी केली होळी

Political News : माजी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जोरदार धक्का, २ खासदारांचा तडकाफडकी राजीनामा

डायबिटीजचे रूग्ण बटाटा खाऊ शकतात का?कोणत्या पदार्थांमुळे वाढते रक्तातील साखर

Suraj Chavan : गुडन्यूज! सूरज चव्हाण होणार बाबा? बायकोचा बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा VIDEO आला समोर

SCROLL FOR NEXT