National Cashew  Day
National Cashew Day Saam Tv
लाईफस्टाईल

National Cashew Day : 'या' 5 लोकांनी चुकूनही करु नका काजूचे सेवन, अन्यथा...

कोमल दामुद्रे

National Cashew Day : आज देशभरात राष्ट्रीय काजू दिवस साजरा केला जात आहे. गोडाच्या पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण याचा हमखास वापर करतो. या कोरड्या फळासाठी लोकांची वाढती लोकप्रियता बघून दरवर्षी 23 नोव्हेंबर रोजी हा दिवस विशेष साजरा केला जातो.

काजूमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, जस्त, लोह, मॅंगनीज आणि सेलेनियम यांसारखी अनेक खनिजे यात आढळतात, ज्यामुळे ते आरोग्यासाठी 'गुणांचा खजिना' बनतात. यामुळेच काजूला ऊर्जेचे पॉवर हाऊस देखील म्हटले जाते. नियमित काजू खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत बरोबर राहून व्यक्ती अनेक आजारांपासून (Disease) दूर राहते. आरोग्यासाठी इतकं फायदेशीर असूनही, या लोकांनी काजूचे सेवन करणे टाळावे याबद्दल जाणून घेऊया

या लोकांनी जास्त काजू खाऊ नये-

1. मायग्रेन

डोकेदुखी (Headache) आणि मायग्रेनचा त्रास असलेल्यांनी काजूचे जास्त सेवन करू नये. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामध्ये असलेले अमिनो अॅसिड डोकेदुखी आणि मायग्रेनच्या वेदना आणखी वाढवू शकते.

2. पोट फुगणे आणि गॅस

काजूमध्ये असलेले फायबर आरोग्यासाठी चांगले असते, परंतु जास्त फायबरमुळे तुमच्या पोटात सूज आणि गॅस होऊ शकतो. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या असल्यास काजूचे सेवन फार कमी किंवा अजिबात करू नये.

3. लठ्ठपणा-

जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर लक्षात ठेवा की काजूचे जास्त सेवन करू नका. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे याच्या अतिसेवनाने तुमचे वजन वाढू शकते.

Cashew

4. उच्च रक्तदाब-

काजूमध्ये जास्त प्रमाणात सोडियम आढळून येते हे कोणत्याही व्यक्तीसाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास होत असेल तर तुम्ही काजूचे सेवन मर्यादित ठेवावे कारण काजूचे जास्त सेवन केल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाब, पक्षाघात आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. जातो . इतकेच नाही तर सोडियमचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होतो.

5. ऍलर्जी

काही प्रकरणांमध्ये, काजू खाल्ल्याने ऍलर्जी देखील होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला उलट्या, खाज, लूज मोशन आणि रॅशेस सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave Care: उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

Today's Marathi News Live : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीच्या मेलने खळबळ

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT