What is a Super Earth planet saam tv
लाईफस्टाईल

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

What is a Super Earth planet: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA सातत्याने दुर्बिणी आणि उपग्रहांच्या मदतीने नवीन ग्रहांचा शोध घेत असते. याच प्रयत्नांमध्ये त्यांना आणखी एका 'सुपर अर्थ' (Super Earth) ग्रहाचा शोध लागला आहे

Surabhi Jayashree Jagdish

नासाच्या शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचा शोध लावला आहे. केप्लर-139f नावाचा एक मोठा ग्रह त्यांनी शोधला आहे. हा ग्रह एका G-प्रकारच्या ताऱ्याभोवती फिरतो, जो आपल्याच सूर्याशी साम्य असणारा तारा आहे. हा ग्रह इतका प्रचंड आहे की त्याचं वजन पृथ्वीपेक्षा सुमारे 36 पट जास्त आहे आणि त्याचा आकार जवळपास नेपच्यून इतका आहे. त्यामुळे या ग्रहाला “सुपर-अर्थ” (Super-Earth) असंही म्हटलं जातंय.

हा ग्रह आपल्यासारख्याच एका वर्षात म्हणजे 355 दिवसांत त्याच्या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, हा ग्रह लपलेला राहिला कसा? यामागचं प्रमुख कारण म्हणजे, त्याचा कक्षेतील Orbital Alignment. म्हणजेच, हा ग्रह असा मार्ग घेत होता की, तो आपल्या दुर्बिणींद्वारे सहज दिसणारा नव्हता.

नासाच्या केप्लर स्पेस टेलिस्कोपने 'transit method' वापरून या ग्रहाचा शोध लावला. या पद्धतीमध्ये जेव्हा एखादा ग्रह त्याच्या ताऱ्याच्या समोरून जातो, तेव्हा ताऱ्याच्या प्रकाशात सूक्ष्म घट होते. हाच प्रकाशाचा थोडासा ‘ट्रांझिट’ म्हणून ओळखला जातो आणि त्यावरून ग्रहाची उपस्थिती ओळखली जाते.

शोधाची दुसरी पद्धत

ग्रह शोधताना वैज्ञानिक केवळ ट्रांझिटवर अवलंबून राहत नाहीत. ते 'रेडियल वेलोसिटी (RV)' पद्धत वापरतात. यामध्ये ग्रह त्यांच्या ताऱ्यावर किती ताकदीने ओढ निर्माण करतो, हे मोजलं जातं. अशा पद्धतीमुळे ताऱ्याची हालचाल मोजून त्या ग्रहाचं अस्तित्व, त्याचं वजन वगैरे माहिती मिळवली जाते.

ट्रांझिट टाइमिंग व्हरिएशन्सचा वापर

वैज्ञानिक 'ट्रांझिट टाइमिंग व्हरिएशन्स (TTVs)' नावाच्या संकेतांचा वापर करतात. यामध्ये एखादा माहिती असलेला ग्रह जेव्हा वेळेच्या तुलनेत अयोग्य वेळी ट्रांझिट करतो तेव्हा त्या विलंबामागे दुसऱ्या लपलेल्या ग्रहाचा प्रभाव असतो, असं समजलं जातं.

प्रिन्सटन विद्यापीठाचे संशोधक केलेब लामर्स आणि जोशुआ विन यांनी असेच काही संशयास्पद संकेत ओळखले. 2023 मध्ये आढळलेल्या केप्लर-139e या ग्रहानंतर त्यांनी पुन्हा जुन्या TTVs तपासल्या आणि त्यातून केप्लर-139f नावाचा ग्रह हाती लागला.

यावरून समजतं की, ग्रह खूप मोठा, वजनदार किंवा गुरुत्वीय शक्तीने भरलेला असला तरीही त्याचं अस्तित्व आपल्याला त्वरित कळेलच असं नाही. यामागे वैज्ञानिक संयम, निरीक्षण कौशल्य आणि आधीच्या आकड्यांचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच; मुख्य निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Early signs of gastric cancer: पोटात कॅन्सरची गाठ तयार होण्यापूर्वी होतात 'हे' बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

सेक्सटॉर्शन, डिजिटल अरेस्ट.. मुंबईकरांनी १५ महिन्यात गमावले ११२७ कोटी रूपये

Tax Saving Tips : करदात्यांच्या कामाची बातमी! टॅक्स वाचवण्याचे ५ मार्ग, ITR फाइल करण्याआधी नोट करा

HBD Sonu Nigam : लग्जरी गाड्यांचा शौकीन सोनू निगम कोट्यावधींचा मालक

SCROLL FOR NEXT