Heart Attack Reasons Saam Tv
लाईफस्टाईल

Heart Attack Reasons : तरुणांमध्ये वाढतेय हार्ट अटॅकचे प्रमाण, नारायणमूर्तींच्या ७० तास काम करण्याच्या सल्ल्यावर डॉक्टरांची पोस्ट व्हायरल

कोमल दामुद्रे

Narayana Murthy Infosys :

मागच्या काही दिवसांपासून इंफोसिसचे सह-संस्थापक नारायणमूर्ती सध्या चांगलेच चर्चेत आहेत. तरुणांना आठवड्याचे ७० तास काम करण्याचा सल्ला दिल्याने सोशल मीडियावर याची चर्चा सुरु झाली आहे.

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि अतिरिक्त कामाचा ताण, वेळेवर न झोपणे यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण तरुणांमध्ये वाढताना दिसून येत आहे. अशातच नारायणमूर्तींनी मुलाखतीत मांडलेले मत तरुणांना फारसे काही रुचले नाही. त्यांनी म्हटले की, देशाच्या प्रगतीसाठी भारतातील तरुणांनी आठवड्याचे ७० तास काम केले पाहिजे. अशातच काही उद्योगपतींनी या मताशी सहमत नसल्याचे सांगितले आहे. तर जेएसडब्ल्यूचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनी या मताला पाठिंबा दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बंगळुरुमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिपक कृष्णमूर्ती यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्यांनी कामाचे तासांचे वेळापत्रक आणि त्याचे आरोग्यावर (Health) होणारे परिणाम सांगितले आहे. डॉ कृष्णमूर्ती यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यांनी म्हटले की, तरुण दिवसभरात किती तास काम करतात यासह त्यांच्या कामाच्या तासांचा वेळही दिला आहे. अतिरिक्त काम केल्याने हृदयावर (Heart) परिणाम होताना दिसून येत आहे.

त्यांनी सांगितले की, दिवसाच्या २४ तास तासात जर तुम्ही आठवड्यातून ६ तास काम करत असाल तर १२ तास होतात. उरलेल्या १२ तासात ८ तास झोप आणि उर्वरीत चार तास हे प्रवास आणि घरातील (Home) इतर कामांसाठी जातील. तर काही कंपन्या कामाचे तास संपल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी ईमेल आणि कॉल्सचं उत्तर द्यावे अशी अपेक्षा देखील करतात. मग तरुणांना हार्ट अटॅक आला तर यायत आश्चर्य वाटण्याचे काही कारणं नाही.

डॉक्टरांच्या या पोस्टवर अनेक तरुणांनी आपले मतही नोंदवले आहे. तसेच सरकारला नोकऱ्यांची संख्या वाढवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT