Karit Fruit Significance on Narak Chaturdashi 2023 Karit Fruit Significance - Saam Tv
लाईफस्टाईल

Narak Chaturdashi 2023 : नरक चतुर्दशीच्या दिवशी कारिट का फोडले जाते? अधिक महत्त्व का? जाणून घ्या

Narak Chaturdashi 2023 Date : आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी साजरी केली जाते.

कोमल दामुद्रे

Karit Fruit Significance:

दिवाळी हा अनेक सणांचा राजा. या काळात दारात रांगोळी, उटण्याचा सुंगंध, फटाके आणि सर्वत्र धामधूम पाहायला मिळते. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला नरक चतुर्थीचा सण साजरा केला जातो. यंदा हा सण १२ नोव्हेंबरला साजरा केला जाईल.

नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा (Celebrate) केला जातो. भगवान श्रीकृष्ण आणि पत्नी सत्यभामा यांनी नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. त्या दिवसापासून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. कधी आहे नरक चतुर्दशी

आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी साजरी केली जाते. यंदा ही तिथी रविवारी १२ नोव्हेंबरला आहे. चतुर्दशी तिथी ही ११ नोव्हेंबरला दुपारी ०१. ५७ पासून सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी १२ नोव्हेंबरला दुपारी ०२.४४ वाजता संपेल. उदय तिथीनुसार चतुर्दशी ही १२ तारखेला असेल.

2. नरक चतुर्दशीच्या दिवशी कारिट का फोडले जाते?

दिवाळीत (Diwali) अभ्यंगस्नानापूर्वी अर्थात नरक चतुर्दशीच्या पहाटे कारिट फळ फोडण्याची परंपरा आहे. कारिट हे फळ भारतात सर्वत्र आढळणारे रानवेलीचे फळ. या फळास कारिंटे, कार्टे, चिरट, चिरटे, कोर्टी, चिर्डी, चिड्डी अशा अनेक नावांनी ओळखले जाते. खेडेगावात या फळाला चिभडं, शेरनी किंवा कर्टुलं या नावाने ओळखले जाते.

हे फळ नरकासूर या राक्षसाचे प्रतिक मानले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाचा वध केला होता. म्हणून या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नानाच्या पूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट फोडलं जाते. त्यातून बाहेर पडणारा रस हे नरकासुराच्या रक्ताचे रुप मानले जाते. कारिट फोडल्यानंतर त्याचा रस जिभेला तर बी कपाळाला लावण्याची पद्धत आहे.

अभ्यंगस्नानाच्या आधी कारिट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध करत त्याच्या रुपात असलेली सारी कटुता, दृष्टता नाहीशी करावी आणि त्यानंतर स्नान करुन दिवाळी पहाट साजरा करण्याची पद्धत आहे.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT