Nag Panchami 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Nag Panchami 2024: यंदा नागपंचमी कधी आहे? कालसर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी पूजेचा शुभ मुहूर्त काय?

Nag Panchami Shubha Muhurta: श्रावणातला पहिला सण नागपंचमी आहे. हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला अत्यंत महत्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी सण साजरा केला जातो.

Manasvi Choudhary

श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला अत्यंत महत्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमी तिथीला नागपंचमी सण साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नागाची पूजा केली जाते. यामुळे नागदेवता प्रसन्न होते.

कधी आहे नागपंचमी

यंदा नागपंचमी हा सण ९ ऑगस्ट २०२४ रोजी साजरी होईल. श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी नागपंचमी हा सण साजरा केला जातो.

नागपंचमी शुभ मुहूर्त

९ ऑगस्ट २०२४ रोजी नागाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पहाटे ५ ते ८ आहे. या दिवशी तीन तासांचा हा काळ पूजेसाठी अत्यंत शुभ असेल.

नाग पंचमी पूजा विधी

हिंदू धर्मात नागपंचमी या सणाला विशेष महत्व असून प्राचीन काळापासून या दिवशी नागाची पूजा केली जाते. शेतकरी नागपंचमीच्या दिवशी सुख, समृद्धी आणि पिकांचे रक्षण व्हावे यासाठी शेतात नागांची पूजा करतात.या दिवशी घरोघरी मातीच्या नागाची पूजा दुधाने स्नान घालून केली जाते. नागदेवतेला दूध, साखर, लाह्या यांच्या नैवेद्य देखील दाखवला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT