Nagpanchmi 2022, Shravan 2022, Shravan special ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Nagpanchmi 2022 : नागपंचमीला अर्पण केल्या जाणाऱ्या ज्वारीच्या लाह्या कशा बनवल्या जातात?

श्रावणातला पहिला सण हा नागपंचमी येतो.

कोमल दामुद्रे

मुंबई : अवघ्या काही दिवसात श्रावण मास सुरु होईल. सगळीकडे प्रसन्न वातावरण असून उन्ह आणि सावलीचा खेळ सुरु असेल.

हे देखील पहा -

श्रावणातला पहिला सण हा नागपंचमी येतो. या दिवशी सगळीकडे नागदेवतेची विधिवत पूजा केली जाते. काही ठिकाणी तांदूळ (Rice), माती व शेणाच्या सहाय्याने नागदेवतेची पूजा केली जाते. ठिकाणी रांगोळीच्या चुण्यांच्या सहाय्याने देखील नागदेवतेची प्रतिमा तयार करुन त्याची मनोभावे पूजा केली जाते. नागपंचमी दिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्र नेसून नागदेवताची पूजा केली जाते. त्यादिवशी नागाला प्रसाद म्हणून वाहिल्या जाणाऱ्या लाह्या घरी कशा तयार करतात हे जाणून घेऊया.

लाह्या कशा तयार करतात -

साहित्य - १ कप ज्वारी, १ कप पाणी

कृती - सर्वप्रथम पाणी (Water) चांगले गरम करुन त्यात ज्वारी १५ मिनिटे भिजत ठेवावी. १५ मिनिटानंतर भिजत घातलेल्या ज्वारीला पाण्यातून उपसून घ्यावी आणि नंतर कॉटन किंवा सूती कापडावर पसरवून घ्या. ज्वारीला उमले तयार झाले की, लोखंडाची कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर वाळवलेली ज्वारी त्यात घाला. ती ज्वारी सुती कापडाच्या सहाय्याने सतत हलवत रहा. काही मिनिटांत ज्वारीच्या लाह्या या तयार होतील.

पूर्वीच्या काळात नागपंचमीला भरपूर ज्वारीच्या लाह्या केल्या जात असत. या लाह्या दळून तयार लाह्या जात्यावर दळून त्याचे पीठ तयार केले जायचे. नंतर त्या पिठाचा तूप गुळ घालून त्याचे मस्त लाडू तयार करत असत.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT