PCOS WOMEN Saam tv
लाईफस्टाईल

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Surabhi Jagdish

आजकाल महिलांची लाईफस्टाईल इतकी बदलली आहे की त्यामुळे अनेक समस्या आपल्या मागे लागतात. यातीलच एक समस्या म्हणजे पीसीओएस. यामध्ये महिलांच्या शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होतो. पीसीओएस या समस्येमुळे स्त्रीबीज तयार होत नाहीत परिणामी पाळी नियमित येत नाही.

यामध्ये महिलांच्या चेहऱ्यावर फोड येणं, चेहऱ्यावरील केस वाढणं या समस्याही बळावतात. पीसीओएसमुळे अंडाशयामध्ये सूक्ष्म द्रवाच्या पिशव्या (गाठी /ग्रंथी) निर्माण होऊ शकतात. मात्र ते बर्‍याचदा पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही आणि त्यांतून अंडी स्रवली जात नाहीत. परिणामी यामुळे ओव्ह्युलेशनच्या नेहमीच्या चक्रामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

मुंबईच्या सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्समधील सल्लागार बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर म्हणाल्या की, पीसीओएसमधील हार्मोनल असंतुलन यामुळे वजन कमी करणं अधिक कठीण होतं. लठ्ठपणामुळे पीसीओएसशी संबंधित इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. जसं की टाइप 2 मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब. दरम्यान पीसीओएसबाबत महिलांच्या मनात अनेक गैरसमज देखील असतात. हे नेमके काय आहेत ते जाणून घेऊया.

पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD) आणि लठ्ठपणा याबाबत असलेले समज व गैरसमज खालील प्रमाणे-

गैरसमज: पीसीओडीसाठी लठ्ठपणा ही एकच गोष्ट कारणीभूत आहे

सत्यता: पीसीओडीसाठी लठ्ठपणा हा एक जोखीमीचा घटक असला तरी हे एकमेव कारण नाहीये. PCOD ही सामान्य वजनाच्या स्त्रियांना देखील प्रभावित करू शकतं.

गैरसमज: पीसीओडीने ग्रस्त प्रत्येक महिलेचं वजन वाढतं

सत्यता: PCOD ने ग्रस्त असलेल्या महिला लठ्ठ असतात असं नाही. सामान्य किंवा कमी बीएमआय असलेल्या अनेक स्त्रियांना ही समस्या असू शकणार आहे.

गैरसमज: वजन कमी झाल्यास पीसीओडी बरा होतो

सत्यता: वजन कमी केल्याने लक्षणं कमी होण्यास मदत होते. मात्र पीसीओडी हा आजार बरा करू शकत नाही.

गैरसमज: पीसीओडीमध्ये वजन हे फक्त जास्त खाण्याने वाढते

सत्यता: PCOD असलेल्या महिलांना अनेकदा इन्सुलिनच्या प्रतिकाराचा सामना करावा लागतो. वजन कमी करणं आव्हानात्मक होतं आणि निरोगी आहारानेही वजन वाढू शकतं.

गैरसमज: PCOD असलेल्या महिला सहज वजन कमी करू शकतात

सत्यता: इंसुलिन प्रतिरोध आणि हार्मोनल समस्यांमुळे, पीसीओडी असलेल्या स्त्रियांसाठी वजन कमी करणं इतरांपेक्षा जास्त आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.

गैरसमज: लठ्ठपणा आणि PCOD हे केवळ प्रजनन समस्यांशी जोडलंय

सत्यता: लठ्ठपणा आणि PCOD मुळे टाईप 2 मधुमेह, हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या चयापचय स्थितींचा धोका देखील वाढू शकणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

SCROLL FOR NEXT