PCOS : पीसीओएसचा त्रास कसा नियंत्रणात आणायचा? तज्ज्ञांनी सांगितला साधा आणि सोपा मार्ग

पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोममुळे आजकाल अनेक महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. PCOS मुळे अंडाशयात लहान सिस्ट म्हणजेच गाठी तयार होऊ शकतात. यामुळे ओव्हुलेशनच्या सामान्य चक्रात व्यत्यय येऊ शकतो.
control PCOS
control PCOSSAAM TV
Published On

आजकाल पीसीओएस म्हणजेच पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोममुळे आजकाल अनेक महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. यामधील एक मुख्य गोष्ट म्हणजे महिलांना ओव्हुलेशन होत नाही. बहुतेक महिलांना अनियमित मासिक पाळी, वजन वाढणं आणि पुरुषांप्रमाणे केसांची वाढ यासारख्या समस्या उद्भवतात. जागतिक स्तरावर 6-26% आणि भारतात 3.7-22.5% च्या उच्च दरासह, PCOS ही स्त्रियांमध्ये सर्वात सामान्य समस्या आहे आणि वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे.

न्यूबर्ग अजय शहा प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शहा म्हणाले की, PCOS मुळे अंडाशयात लहान सिस्ट म्हणजेच गाठी तयार होऊ शकतात. यामुळे ओव्हुलेशनच्या सामान्य चक्रात व्यत्यय येऊ शकतो. मासिक पाळीच्या 14 दिवस आधी जेव्हा अंडाशयातून अंडी बाहेर पडतात तेव्हा एक सामान्य चक्र सुरू होते. PCOS मुळे वंध्यत्व येऊ शकतं कारण बहुतेक वेळा या समस्येमुळे अंडी सोडली जात नाही आणि अंडाशयात राहतात. त्यामुळे सुमारे सत्तर टक्के स्त्रिया गर्भधारणा करू शकत नाहीत.

मुंबईतील फोर्टीस रूग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संगीता रावडे यांनी सांगितलं की, पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हे ओव्हुलेशनच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे एक सामान्य कारण आहे. PCOS चा त्रास ज्यावेळी होतो तेव्हा शरीरात ल्युटीनायझिंग हार्मोनची पातळी वाढते आणि अंडाशयात ॲन्ड्रोजन नावाचं हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होऊ लागतात. ही समस्या सामान्यतः प्रजननक्षम वयातील स्त्रियांमध्ये दिसून येते. त्यावर उपचार करण्यासाठी, सर्वप्रथम जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये दररोज किमान एक तास व्यायाम, वजन कमी करण्यासाठी सकस आहार आणि योग किंवा ध्यानाद्वारे तणाव कमी करणं यांचा समावेश आहे.

control PCOS
Postpone Periods Dates: सणासुदीला पुजेनिमित्त मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताय? प्रजनन क्षमतेवरही होतोय परिणाम

पीसीओएस ही समस्या उपचारांमुळे बरी होऊ शकत नाही. मात्र ती नियंत्रणात आणली जाऊ शकते. याचं नियंत्रण कसं करावं हे पाहूयात.

जीवनशैलीत बदल

योग्य वजन राखल्याने प्रजनन क्षमतेत वाढू शकते. निरोगी आहार आणि नियमित व्यायाम करून वजन कमी केल्याने मासिक पाळी सामान्य होऊ शकते. परिणामी ओव्हुलेशनची शक्यता वाढते. हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यासाठी नियमित व्यायामाला प्राधान्य द्या.

PCOS च्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी महिलांना जीवनशैलीत बदल करण्याचा सल्ला देण्यात येतो. यामध्ये महिलांनी व्यायामालाही प्राधान्य दिलं पाहिजे.
डॉ. संगीता रावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ, फोर्टीस रूग्णालय

आहारामध्ये बदल करा

कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आहार इंसुलिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. याचं प्रमाण पीसीओएसचा त्रास असलेल्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. शिवाय अशावेळी प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त स्नॅक्स तसंच गोड पदार्थांचं सेवन कमी केलं पाहिजे.

ताणाला नियंत्रित करा

महिलांना असलेल्या ताणतणावाचा परिणाम हा प्रजनन क्षमतेवर होतो. त्यामुळे ध्यान धारणा, योगा तसंच मेडिटेशन यावर भर दिला गेला पाहिजे.

वेळोवेळी तपासणी

आपलं आरोग्य, हार्मोन्सची पातळी आणि PCOS लक्षणांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही नियमित तपासणी करा. शिवाय याविषयी तुमच्या डॉक्टराशीही चर्चा करा.

control PCOS
PCOS मुळे वंध्यत्वाचा धोका कितपत? महिला आई होऊ शकतात का?

PCOS असलेल्या अनेक स्त्रियांना लठ्ठपणा आणि इन्सुलिनच्या समस्या असतात. त्यामुळे वजन कमी करणं हा उपचारांचा एक महत्त्वाचा भाग आहे. PCOS शी संबंधित वंध्यत्वाच्या समस्येवर मात करण्यासाठी ओव्हुलेशन प्रवृत्त करण्यासाठी उपचार केले जातात. ज्यामुळे अंडी बाहेर पडण्यास मदत होते आणि गर्भधारणेची शक्यता वाढते, असंही डॉ. संगीता यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com