mXmoto Electric Scooter Saam Tv
लाईफस्टाईल

New Electric Scooter: 120km ची जबरदस्त रेंज, किंमतही 1 लाखपेक्षा कमी; लॉन्च झाली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर

mXmoto Electric Scooter: 120km ची जबरदस्त रेंज, किंमतही 1 लाखपेक्षा कमी; लॉन्च झाली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर

Satish Kengar

mXmoto Electric Scooter:

इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी mXmoto ने भारतीय बाजारात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. याला mXv Eco असे नाव देण्यात आले आहे. ही स्कूटर MX9 इलेक्ट्रिक मोटरसायकलसह निर्मात्याच्या लाइनअपमध्ये सामील होईल.

ब्रँड नवीन इलेक्ट्रिक क्रूझर बाईकवर देखील काम करत आहे. ज्याला M16 म्हटले जाईल. mXmoto mXv दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. व्हेरियंटमधील फरक फक्त बॅटरी पॅक आणि राइडिंग रेंजमध्ये असेल. याचबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ...

बॅटरी पॅक, रेंज आणि किंमत

जर आपण याच्या बॅटरी पॅक आणि रेंजबद्दल बोललो तर, ही EV लहान बॅटरी पॅकमध्ये एका चार्जवर 80 किमीची रेंज देऊ शकते. याची एक्स-शोरूम किंमत 84,999 रुपयेआहे. जर आपण बिग बॅटरी पॅकच्या राइडिंग रेंजबद्दल बोललो तर ही 105 ते 120 किमी पर्यंत रेंज देऊ शकते. याची एक्स-शोरूम किंमत 94,999 रुपये आहे. (Latest Marathi News)

LifePO4 बॅटरी पॅक

LifePO4 बॅटरी पॅक mXmoto mXv इलेक्ट्रिक स्कूटरसाठी वापरला जात आहे. यामध्ये ग्राहकांना 3000-वॅटचे BLDC इलेक्ट्रिक मोटर हब युनिट मिळते.

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात टीएफटी स्क्रीन, ऑनबोर्ड नेव्हिगेशन, ब्लूटूथ कॉलिंग सपोर्ट, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट, एलईडी लाइटिंग आणि सेल्फ डायग्नोसिस सिस्टम आहे. कंपनी यात फ्रंट-डिस्क ब्रेक आणि कॉन्ट्रास्ट स्टिचिंग देखील देत आहे. mXmoto चे म्हणणे आहे की, स्कूटर LED डे टाईम रनिंग लॅम्प्स, अडॅप्टिव्ह लाइटिंग आणि व्हेरिएबल लाइट इंटेन्सिटीसह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT