Motion Sickness  SAAM TV
लाईफस्टाईल

Motion Sickness : प्रवासात होणाऱ्या मळमळ-उलटीच्या त्रासाला वैतागलात? 'हे' सोपे उपाय तुम्हाला देतील मिनिटांत आराम

Travel Tips : अनेकांना प्रवास हा खूप आवडतो. पण प्रवासात होणाऱ्या मळमळ-उलटीच्या त्रासाने त्यांचे आरोग्य बिघडते. तसेच प्रवासातही अडचणी येतात. अशात आनंदी प्रवास करायचा असल्यास घरगुती उपाय मोशन सिकनेसवर आळा घालतील.

Shreya Maskar

प्रवास हा तुमच्या उत्तम मानसिक आरोग्याची पॉवर बँक आहे. पण काहींना प्रवासादरम्यान मळमळते, उलट्या होतात. यामुळे त्यांचा प्रवास अडचणीचा होतो. म्हणून काही लोक प्रवास आवडत असूनही करणे टाळतात. प्रवासात होणारा मोशन सिकनेस प्रवासाचा आनंद कमी करतो. या मोशन सिकनेस पासून वाचण्यासाठी मग लोक प्रवासात गाणी ऐकतात. तसेच पुस्तक वाचतात. पण यामध्ये प्रवासाचा आनंद घ्यायचा राहून जातो. त्यामुळे प्रवासाचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी आणि मोशन सिकनेस थांबवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा.

प्रवासात 'हे' पदार्थ सोबत ठेवा

बडीशेप

प्रवासात अनेकांना पोटात मळमळते आणि उलटी होते. यामुळे त्यांचा प्रवास खराब जातो. पण प्रवास सुखकर होण्यासाठी तुम्हाला मळमळत असल्यास बडीशेप चघळावी. कारण बडीशेपमुळे पचन सुरळीत होतो. तसेच ॲसिडीटीची समस्या दूर होते.

केळी

प्रवासादरम्यान कधीही केळी सोबत ठेवावी. कारण केळ्यामुळे प्रवासात आपले पोट भरलेले राहते. तसचे प्रवासात उलटी, मळमळ, पोटदुखी होत असल्यास केळी रामबाण उपाय आहे. प्रवासात केळी खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते.

वेलची

प्रवासात वेलची चघळल्याने मोशन सिकनेसचा त्रास होत नाही. तसेच तोंडाला छान वास येतो आणि आपण रिफ्रेशही होतो.

ज्येष्ठमध

प्रवासात मोशन सिकनेसचा त्रास असल्यास नेहमी आपल्यासोबत ज्येष्ठमधाची पावडर सोबत ठेवा. यामुळे मळमळ आणि अपचनाचा त्रास कमी होईल. ही पावडर तुम्ही पाण्यात घालून पिऊ शकता.

खारी बिस्कीट

प्रवासात कधीही गोड बिस्कीटे खाऊ नये. कायम आपल्यासोबत खारी बिस्कीटे सोबत ठेवावी. यामुळे तोंडाला चव येते. तसेच पोटातील मळमळ देखील थांबते. नमकीन बिस्कीटांमध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. जे प्रवासात फायेदशीर ठरते.

प्रवासात मोशन सिकनेसचा त्रास होत असल्यास खडकी जवळ बसावे. कारण हवा खेळती राहणे खूप गरजेचे आहे. कोंडलेल्या वातावरणामुळे पोटात मळमळ होऊ शकते. तसेच प्रवासादरम्यान जास्त खाणे टाळा. प्रवासात नेहमी हलका आहार घ्यावा. मसालेदार , तळलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे मोशन सिकनेसचा त्रास वाढू शकतो. प्रवासात खूप मळमळत असेल तर लिंबूपाणी आणि सोडा प्यावा. यामुळे पोट मळमळ शांत होते आणि मूड फ्रेश होतो. तसेच काळे मीठ देखील मोशन सिकनेसवर फायदेशीर असते. काळे मीठ पाण्यात टाकून पाणी प्यावे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

SCROLL FOR NEXT