Benefits of mashroom, Health tips, Food tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरेल मशरुम !

मशरुमचा आरोग्यासाठी वापर कसा होतो जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : मशरुम हे अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. याचा वापर आपण आपल्याला आहारात केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होतो

हे देखील पहा -

मशरूमचे अनेक प्रकार आहेत जे वेगवेगळ्या रंगात आणि आकारात आपल्याला बाजारात पाहायला मिळतात. मशरूम खाण्यास अतिशय चविष्ट असण्यासोबतच शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासही मदत करते. मशरूममध्ये सोडियम आणि चरबीचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी त्याचा वापर अधिक होतो. यात असणाऱ्या कमी कॅलरीज आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. याची निवड करताना देखील अधिक काळजी घ्यायला हवी. याचा आपल्या आहारात समावेश कसा करावा हे जाणून घ्या.

मशरूम खाण्याचे फायदे (Benefits)-

१. मशरूममध्ये तांबे मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे आपली हाडे मजबूत राहण्यास मदत होते. तसेच यात असणाऱ्या घटकांमुळे शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होऊन शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करतात.

२. मशरूममध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला वृद्धत्वाच्या समस्यांपासून संरक्षण करतात. शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

३. मशरुममध्ये जीवनसत्त्व ब चा चांगला स्त्रोत आहे. जो शरीराच्या पचनसंस्थेसाठी, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी व हृदयासाठी फायदेशीर आहे.

४. मशरूममध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स फार कमी प्रमाणात आढळतात, ज्यामुळे वजन आणि रक्तातील साखरेची (Sugar) पातळी कायम राहते.

५. मशरुमचे नियमित सेवन केल्यास थकवा व नैराश्य कमी होण्यास मदत होते. तसेच शरीराला ऊर्जा देखील मिळते. मशरुममध्ये मुबलक प्रमाणात ड जीवनसत्त्व असल्यामुळे अनेक आजारांवर मात करता येते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Investment: आता NSE वर शेअर्सप्रमाणे खरेदी करू शकाल सोने; काय आहे EGR? जाणून घ्या फायदे-तोटे

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार, शिवसेनेतील बडा नेता नाराज? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Accident: पालघरमध्ये वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची धडक, १२ जणांचा मृत्यू; मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रक्ताचा सडा

Maharashtra News Live Update: अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Makeup Box Full Kit: परफेक्ट मेकअप लूकसाठी बॉक्समध्ये असायला पाहिजेत 'हे' ब्यूटी प्रॉडक्ट

SCROLL FOR NEXT