Motivational Quotes Saam Tv
लाईफस्टाईल

Motivational Quotes : प्रेरणादायी विचारांनी करा दिवसाची सुरुवात, यश नक्कीच मिळेल...

Success Quotes In Marathi : असं म्हटलं जातं की, वेळेला वेळीच वेळ द्या. कोणतीही गोष्ट करताना माणूस योग्य वेळेची वाट पाहात बसतो. परंतु, असे केल्याने योग्य वेळ आयुष्यात कधीच येतं नाही. त्यामुळे भविष्याच पूर्ण चक्र बदलत.

कोमल दामुद्रे

Motivational Quotes In Marathi :

असं म्हटलं जातं की, वेळेला वेळीच वेळ द्या. कोणतीही गोष्ट करताना माणूस योग्य वेळेची वाट पाहात बसतो. परंतु, असे केल्याने योग्य वेळ आयुष्यात कधीच येतं नाही. त्यामुळे भविष्याच पूर्ण चक्र बदलत.

चढ-उतार आणि संघर्षांनी भरलेल्या या जगात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. त्यासाठी तो अधिक मेहनतही घेत असतो. पण हे यश (Success) प्रत्येकाला मिळेलच असे नाही. अनेक वेळा कष्ट करुनही लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळत नाही. आयुष्यात कोणतेही यश किंवा अपयश हे शेवटचा पर्याय नसतो. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार (Negative Thoughts) करत असाल. वेळेला प्राधान्य देत नसाल, सतत अपयश येत असेल तर या गोष्टी कायम लक्षात ठेवा. (motivational thoughts in success marathi)

आयुष्यात बरेचदा अशा गोष्टी होतात जेव्हा तुम्हाला अनेक गोष्टी कठीण वाटू लागतात. त्यासाठी आपण ध्येय बदलून चालणार, तर काही वेळेस (Time) वेगळ्या मार्गाने आपले ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही तरी करुन दाखवण्याची क्षमता आणि गुणवत्ता असते. जाणून घेऊया जीवनात यश मिळवून देणारे ५ मंत्र

  • आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगू नये कारण दगड पाण्यात पडला की तो स्वतःच्या वजनाने बुडतो.

  • आयुष्य शिक्षकांपेक्षा कठोर आहे कारण शिक्षक तुम्हाला धडा शिकवल्यानंतर तुमची परीक्षा घेतात, पण आयुष्य तुमची परीक्षा घेऊन धडा शिकवते.

  • वारा कधीच एकाच दिशेने वाहत नाही आणि वेळोवेळी बदलत राहतो, त्याचप्रमाणे तुमचे नशीब देखील वेळोवेळी बदलत असते, त्यामुळे आयुष्यात आलेल्या कोणत्याही दु:खाने किंवा अपयशाने कधीही निराश होऊ नका.

  • समस्या किंवा आव्हाने माणसाच्या आयुष्यात कधीच येत नाहीत. त्यांच्यामागे नेहमी एक धडा असतो जो येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवतो.

  • जर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ वेळेवर मिळवायचे असेल, तर तुम्हाला ते करण्याची पद्धत किंवा दुसऱ्या शब्दांत तुमचे स्वतःचे जीवन बदलावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT