Mother Name on Satbara  Saam TV
लाईफस्टाईल

Mother Name on Satbara : सातबाऱ्यावर लागणार आईचं नाव; राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'या' तारखेपासून अंमलबजावणी

Mother Name on Satbara Form : १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन किंवा एखादी सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावात आता आईच्या नावाचा उल्लेख होणार आहे.

Ruchika Jadhav

राज्य सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. विविध कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश केल्यानंतर आता अर्जदाराच्या सातबाऱ्यावर देखील आईचं नाव लागणार आहे. भूमी अभिलेख विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

काय आहे निर्णय

१ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन किंवा एखादी सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावात आता आईच्या नावाचा उल्लेख होणार आहे. भूमी अभिलेख विभागामार्फत याबाबत संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

आईच्या नावासाठी सातबाऱ्यात नवा कॉलम तयार केला जात आहे. त्यामुळे पुढील ६ महिन्यांत याची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळाली आहे. आईचे नाव लावण्यासाठी काही कागदपत्रे गरजेची आहेत. आई असल्याचा पुरावा दिल्यानंतरच आईचे नाव लावता येणार आहे. तलाठी कार्यालयात शहानिशा केल्यानंतर ही नोंदणी होईल.

विवाहाच्या आधीच्या नावानेही होईल नोंदणी

सध्या महिलांची नावे लावताना महिलेचे स्वत:चे नाव, पतीचे नाव आणि अडनाव असा क्रम आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावताना त्यांचे आधीचे म्हणजे लग्नापूर्वीचे नाव देखील लावण्याची मुभा असणार आहे.

अभिलेख विभागामार्फत घेण्यात आलेल्या निर्णयात १ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावामागे आईचं नाव लावलं जाणार आहे. तसेच या तारखेआधी जन्मलेल्या व्यक्तींना आपल्या आईचे नाव सातबाऱ्यावर लावायचे असल्यास ते देखील नाव लावू शकतात. फक्त त्यासाठी आपल्या आईची ओळख पटवून देणारा पुरावा त्या व्यक्तीला जमा करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT