Home Remedies For Cold & Cough saam tv
लाईफस्टाईल

Cold & Cough : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय तुमच्या किचनमध्येच आहे, डॉक्टरच्या औषधांशिवाय व्हाल बरे

Home Remedies For Cold & Cough: बऱ्याच वेळेस आपण किरकोळ आजारांसाठी दवाखाना गाठतो.

Saam Tv

सर्दी खोकला ही नेहमीची समस्या झाली आहे. आपल्याला या समस्या किरकोळ वाटतात. त्यावेळेस आपण दवाखाण्यात जातो, गोळ्या औषधं खेऊन ही समस्या दूर करतो. मात्र काही वेळेस औषधांचा चांगला परिणाम आपल्यावर दिसत नाही. अशा वेळेस आपण आयुर्वेदीक पद्धतीने उपचार केले पाहिजेत. चला तर जाणून घेवू सोप्या घरगुती औषधांच्या टिप्स.

मध आणि आल्याचे मिश्रण

आल्यामध्ये अँटीबायोटिक आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. तर मध हे घश्याची जळजळ कमी करतात. त्यामुळे हे मिश्रण एकत्र करुन दुधासोबत सेवन करू शकता. हे मिश्रण तुमचा खोकला काहीच दिवसात घालवेल.

तुळस आणि काळी मिरी

तुळस ही नैसर्गिक वनस्पती आहे तर काळी मिरी खोकल्यावरचे औषध. हे मिश्रण एकत्र करुन तुम्ही कोपट पाण्यात मिक्स करुन त्याचे सेवन करू शकता.

घरगुती सर्वात सोपा उपाय

तुम्ही घरात गरम पाण्याची वाफ घ्या. त्याने नक्कीच एका दिवसात तुम्हाला फरक जाणवेल. सर्दीमुळे बंद झालेले नाक वाफ घेतल्याने उघडते. तसेच घश्याला आलेली सुजन सुद्धा कमी होते आणि खोकल्यापासून आराम मिळतो.

'हे' पेय ठरेल सगळ्यात गुणकारी

लहानमुलांपासून ते वृद्धांपर्यत तुम्ही सगळ्यांनाच दुध आणि हळदीचे सेवन करायला सांगता. तेच पेय सर्दी किंवा खोकला झाल्यावर तुम्ही केले तर तुमची समस्या एका रात्रीतच दूर होण्याची शक्यता आहे.

कोमट पाणी 'हा' एक पदार्थ

तुम्ही कोमट पाण्यात लिंबू मिसळून त्याचे सेवन केल्याने सर्दी खोकल्याला लांब करु शकता. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. तसेच घसादुखीपासून आराम मिळतो आणि सर्दी खोकल्याचा त्रासही कमी होतो. हे सोपे आणि घरगुती उपचार केल्याने तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By: Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

Today Horoscope: अचानक हाती पैसा मिळेल, पगारवाढ होण्याची शक्यता; वाचा तुमचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT