Mosquitoes saam tv
लाईफस्टाईल

Mosquitoes Bite: 'अशा' लोकांच्या जवळ अजिबात फिरकत नाहीत डास; काय आहे कारण?

Mosquitoes did not Bite Some People: असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळही डास येत नाहीत. मात्र असं का होतं, यामागे वैज्ञानिक कारण काय आहे आणि डासांपासून बचाव करण्याचे सोपे मार्ग कोणते आहेत ते जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

रात्री गाढ झोपेत असताना अनेकदा आपल्याला जाग येते. याचं कारण असतो एक डास. रात्री झोपेत जेव्हा आपल्याला डास चावतात तेव्हा आपली झोपमोड होते. दररोजच्या या डासांमुळे होणार्‍या झोपेमोडीने तुम्ही पुरते वैतागत असाल. मात्र तुम्ही कधी नीट नोटीस केलंय का काही लोकांना डास अजिबात चावत नाही. मुळात त्यांच्याकडे डास अजिबात फिरकतंही नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीत.

माहितीनुसार, डासांकडे एक अद्भुत सेन्सर सिस्टम आहे. या सिस्टीमच्या मदतीने ते रक्त शोषण्यासाठी कोणती व्यक्ती योग्य हे ठरवतात.

अस्वच्छ शरीर असू शकतं कारण?

खरं तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातून एका वेगवेगळ्या प्रकारचा वास येत असतो. जो त्यांच्या त्वचेतील घाण किंवा अस्वच्छपणामुळे येतो. काही लोकांचं शरीर डासांना आकर्षित करत नाही. त्याचप्रमाणे 'ओ' रक्तगटाच्या व्यक्तींकडे डास अधिक आकर्षित होतात असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. 'अ' गटातील लोकांकडे मात्र डास अधिक प्रमाणात फिरकत नाहीत.

घाम आणि शरीराचं तापमान यावर गोष्टी अवलंबून

डास हे शरीराचं तापमान आणि घाम यांच्यामध्ये असलेल्या लॅक्टिक एसिडकडे अधिक आकर्षित होतात. ज्या व्यक्तींना जास्त घाम येत नाही किंवा ज्यांच्या शरीराचं तापमान सामान्य असतं तेव्हा त्या व्यक्तींकडे डास अधिक फिरत नाही.

कपड्यांचा रंगही पाहतात डास

तुम्हाला हे वाचून खरं वाटणार नाही मात्र पण डास गडद रंगांकडे (काळा, गडद निळा, लाल) यांच्याकडे आकर्षित होतात. हलक्या रंगाचे कपडे घालणाऱ्या लोकांभोवती डास कमी प्रमाणात फिरतात.

डास चावू नये म्हणून काय करावं?

  • हलक्या रंगाचे कपडे घाला

  • जास्त घाम येणार नाही याची काळजी घ्या

  • शक्य तितकं शरीर स्वच्छ आणि कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करा

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT