Morning Fatigue Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Fatigue : सकाळी उठल्यानंतर काम करायची इच्छा होत नाही ? सतत आळस येतो तर, करा 'हे' उपाय

काही लोक सकाळी उठल्यानंतर मोबाईलवर किंवा टिव्हीवर टाइमपास करत बसतात.

कोमल दामुद्रे

Morning Fatigue : सकाळी उठल्यानंतर कधी तरी आपल्याला फ्रेश वाटत नाही. आपल्याला सतत अंथरुणात लोळावेसे वाटते किंवा झोपावेसे वाटते परंतु, काम आणि इतर गोष्टीमुळे आपल्याला अजून थकवा जाणवतो.

काही लोक सकाळी उठल्यानंतर मोबाईलवर (Mobile) किंवा टिव्हीवर टाइमपास करत बसतात. जर तुम्हाला उठल्यावर पाय जमिनीवर ठेवावेसे वाटत नसेल तर ही तुमची फार मोठी कमजोरी असू शकते.

यासोबतच काही जण उठल्यानंतर ऑफिसमध्ये (Office) दिवसभर जांभई देत राहतात. जर तुम्हालाही या वाईट दैनंदिन दिनचर्येचा त्रास होत असेल, तर लगेच दुरुस्त करा. ही वाईट सवय सुधारण्यासाठी तुम्ही काही घरगुती टिप्स अवलंबू शकता. या टिप्सच्या मदतीने तुम्ही उठल्यानंतर उत्साही वाटू शकता. चला जाणून घेऊया दिवसभर तुमचे शरीर कसे ऊर्जावान ठेवायचे?

१. व्यायाम

Yoga

आयुर्वेदात ही फार जुनी चिकित्सा पद्धती मानली जाते. या थेरपीद्वारे तुम्ही तुमची सवय सुधारू शकता. यासाठी सकाळी उठल्यानंतर संपूर्ण शरीराचा सुमारे २० ते २५ मिनिटे व्यायाम करा. यामुळे तुम्हाला खूप आराम वाटेल. त्याचबरोबर शरीरातील रक्ताभिसरणही चांगले होते.

२. सूर्योदयापूर्वी उठा -

Early Morning

जर तुम्हाला सकाळी उठणे मोठे काम वाटत असेल तर यासाठी तुमच्या सवयींमध्ये काही बदल करा. विशेषत: सूर्योदयानंतर कधीही उठू नका, तर सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे मन सक्रिय राहते. सकाळी लवकर उठल्यानंतर योगा आणि प्राणायाम करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ध्यान देखील करू शकता.

३. आहारात बदल -

diet Changes

योग्य आहार न घेतल्याने तुमच्या शरीरात आळस येतो. विशेषतः तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा आहारात समावेश करू नका. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर हिरव्या भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करा. तसेच, गरम आणि चांगले शिजवलेले अन्न खा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: २८ वर्षीय महिलेचा दीड वर्षाच्या मुलासह विहिरीत आढळला मृतदेह, परभणीतील घटना

Rahul Gandhi : मतचोरीच्या मुद्द्यामुळे माझ्या जीवाला धोका; राहुल गांधींची कोर्टात माहिती

MSRTC: लाडक्या बहिणींची सरकारला रक्षाबंधनाची भेट, ST महामंडळाची ४ दिवसांत सुस्साट कमाई

पालघरमध्ये कुऱ्हाडीने हल्ला; आरोपीला झाडाला बांधलं अन...; धक्कादायक कृत्यानं परिसरात खळबळ|VIDEO

Crime: मामाच्या घरून परतताना दिव्यांग तरुणीवर सामूहिक बलात्कार, बचावासाठी पळत राहिली पण...; घटनेपूर्वीचा CCTV व्हिडीओ समोर

SCROLL FOR NEXT