Morning Body Pain  Saam Tv
लाईफस्टाईल

Morning Body Pain : सकाळी उठल्यानंतर अचानक पाठ दुखू लागते ? फक्त 'ही' गोष्ट करा, दुखणे कायमचे गायब

पाठ व कंबर का दुखते ? तर कधी तरी आपण झोपेतून अचानक उठतो किंवा आपण वापर असलेले अंथरुण चुकते

कोमल दामुद्रे

Morning Body Pain : दिवसभराच्या थकव्यामुळे बऱ्याचदा रात्री चांगली झोप लागते पण सकाळी फ्रेश वाटत जरी असले तरी कंबर व पाठ दुखीचा त्रास होऊ शकतो. पाठ व कंबर का दुखते तर कधी तरी आपण झोपेतून अचानक उठतो किंवा आपण वापर असलेले अंथरुण चुकते त्यामुळे अशा अनेक समस्यांना सकाळी तोंड द्यावे लागते. ज्यामुळे आपला संपूर्ण दिवस चिंतेत जातो.

परंतु, काहीवेळेस या आजारांवर (Disease) किती जरी औषधे केली तरी परिणाम मिळत नाही. अशावेळी आपण आपल्या झोपेच्या सवयींवर किंवा अथरुणांवर विशेष लक्ष द्यायला हवे. जर रात्री चांगली झोप घेतल्यानंतर सकाळी उठल्यावर तुमची पाठ दुखू लागली तर समजा तुमच्या पलंगाची गादी आता खराब झाली आहे आणि ती बदलण्याची वेळ (Time) आली आहे. एवढ्या खराब गादीवर झोपून तुम्ही तुमची तब्येत सुधारण्याऐवजी तुमची तब्येत बिघडवत आहात. आज आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही जाणू शकता की आता त्या गादीचा तुम्हाला काही उपयोग नाही.

1. सतत वास येणे

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मॅट्रेस (Bad Mattress) मधून विचित्र वास येऊ लागला आहे किंवा त्यावर झोपताना तुम्हाला वारंवार शिंका येऊ लागल्या आहेत, तर याचा अर्थ असा की तुमची गादी आता व्हायरस आणि बॅक्टेरियाचे घर बनले आहे. अशा गाद्या वेळेत बदलल्या पाहिजेत. तुम्ही असे न केल्यास तुम्ही आजारी पडू शकता.

2. झोपल्यानंतर शरीर गरम होणे

जर तुम्हाला अंथरुणावर झोपल्यानंतर गरम वाटत असेल आणि घाम येऊ लागला तर हे लक्षण आहे की आता गादीने तिचे नैसर्गिक गुणधर्म गमावले आहेत आणि त्यात उष्णता आणि थंडी शोषण्याची क्षमता नाही. तुमच्या खोलीत तापमान खूप गरम किंवा थंड ठेवल्यामुळे अशी समस्या अनेकदा उद्भवते.

Morning Body Pain

3. स्ट्रिंग्स सैल होणे

लवचिकतेसाठी स्ट्रिंग्स मॅट्रेसमध्ये बसवल्या जातात, ज्यामुळे ते शरीराच्या वजनानुसार ते एडजस्ट करतात. परंतु जर गादीवर झोपताना हवा तसा मऊपणा येत नसेल तर समजावे की त्याची स्प्रिंग खराब झाला आहे किंवा त्याचा मऊपणा खराब झाला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही वेळेत बदल केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगले राहील.

4. पाठ आणि खांदा दुखणे

रोज सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या खांद्यावर आणि पाठीत दुखत असेल तर हे लक्षण आहे की तुमची गादी तुमच्या वजनानुसार स्वतःला एडजस्ट करू शकत नाही. त्यामुळे रात्रभर पडून राहूनही तुमचे शरीर ताठ राहते. या प्रकरणात नवीन गादी खरेदी करणे चांगले आहे

5. गादी किती जुनी झाली हे लक्षात ठेवा

इतर सर्व गोष्टींप्रमाणे, मॅट्रेस (Bad Mattress) चे देखील एक निश्चित वय असते. सामान्यतः त्यांचे वय 7 वर्षे मानले जाते परंतु सामान्यतः लोक त्यांना 10 वर्षे मानतात. तसेच, या 10 वर्षानंतर, ते कोणत्याही किंमतीत बदलले पाहिजेत, अन्यथा ते तुम्हाला कायमचे पाठदुखी देतील. यामुळे तुम्हाला नफा कमी आणि तोटा जास्त होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारकडून विद्यार्थ्यांना लॅपटॉप-सायकल फ्री? केंद्र सरकारची विद्यार्थ्यांसाठी नवी योजना?

Maharashtra Live News Update: वाशिमध्ये मतदानाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रचाराचे बॅनर,पोस्टर आणि फ्लेक्स काढले

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT