Monsoon Special Recipe SAAM TV
लाईफस्टाईल

Samosa Recipe: बाहेर पाऊस पडला, चमचमीत खायची इच्छा होतेय? खमंग, खुसखुशीत हॉटेल स्टाईल समोसा घरीच बनवा

Samosa Recipe in Marathi: पावसात चटपटीत खाण्याचा आनंद वेगळा आहे. पण आनंदासोबत आरोग्यही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे जिभेचे चोचले घरी पुरवा. खमंग हॉटेल स्टाईल समोसा बनवा. वाचा सविस्तर रेसिपी..

Shreya Maskar

पावसात जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण बाहेरचे अनेक पदार्थ खातो. पण पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यास घातक ठरू शकते. त्यामुळे तुमच्या आवडीचे पदार्थ घरीच बनवा. पावसात वडापाव, भजी, समोसा, कटलेट असे पदार्थ खायला खूप आवडतात. चला तर मग आज आपण यातील हॉटेल स्टाईल समोसा घरी बनवायला शिकूया. साधी सोपी रेसिपी जाणून घ्या.

साहित्य

  • ब्रेड स्लाइज

  • उकडलेले बटाटे

  • बारीक चिरलेला कांदा

  • उकडलेले मटार

  • कोथिंबीर

  • धने-जिरे पावडर

  • गरम मसाला

  • आमचूर पावडर

  • हिरवी मिरची

  • चवीनुसार मीठ

  • चाट मसाला

कृती

हॉटेल स्टाईल समोसा घरी बनवण्यासाठी सर्वप्रथम उकडलेले मटार आणि बटाटे कुस्करून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल टाकून गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची छान परतून घ्या. यात धने-जिरे पावडर , चाट मसाला, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर, गरम मसाला टाकून सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या. शेवटी कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करून घ्या. दुसरीकडे ब्रेडच्या कडा कापून त्याचा त्रिकोण बनवून घ्या आणि त्यात छान सारण भरा. ब्रेडच्या कडा पाण्याने बंद करून घ्या. तेलात मंद आचेवर खुसखुशीत होईपर्यंत समोसे तळून घ्या. पावसात झणझणीत चटणीसोबत खमंग समोसे खा.

समोसा बनवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • समोश्याच्या पारीसाठी मैदा मळताना त्यात तेल किंवा तूपाचे मोहन घालावे. यामुळे समोसा खुसखुशीत होतो.

  • मैद्याचे पीठ घट्ट मळा. कारण सैलसर पीठ असल्यास समोसे खुसखुशीत होत नाही.

  • मैद्याचे पीठ मिळताना कोमट पाण्याचा वापर करावा.

  • मैद्याचे पीठ मळून झाल्यावर फ्रिजमधे दोन- तीन तास तरी झाकून ठेवा.

  • समोसा जास्त गरम तेलामध्ये तळू नये.

  • समोश्याचं सारण जास्त ओलसर ठेवू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT