Monsoon Skin Care SAAM TV
लाईफस्टाईल

Monsoon Skin Care : पावसाळ्यात चमकदार त्वचेसाठी करा नॅचरल फेशियल, पार्लरसारखा ग्लो घरच्याघरी

Natural Facial Mask : पावसात दमट हवामानामुळे चेहऱ्याचे आरोग्य बिघडते. त्वचा कोरडी आणि तेलकट राहते. अशावेळी पावसाळ्यात त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी घरगुती पदार्थांपासून नॅचरल फेशियल तयार करा.

Shreya Maskar

पावसाळ्यातल्या शरीरासोबत त्वचेची देखील विशेष काळजी घेतली पाहिजे. दमट वातावरणामुळे त्वचा कोरडी तसेच काहींची तेलकट होते. यामुळे पावसाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी महिला पार्लरमध्ये धाव घेतात. महागडी फेशियल करूनही त्यांची त्वचा मुलायम होत नाही. यासाठी तुम्ही पावसात घरीच काही पदार्थांपासून नॅचरल फेस मास्क तयार करा. ज्यामुळे पावसात त्वचेची पोत सुधारेल आणि त्वचा हायड्रेट राहील.

पपई

पपई आरोग्यासोबत त्वचेसाठीही फायदेशीर आहे. पपईतील पोषक घटक त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. पपईचे फेस मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पपईचा गर काढावा. त्यात दही, कोरफडीचा गर आणि गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यावर, मानेवर, हाता पायावर लावून छान मसाज करावा. २० ते २५ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर २ ते ३ मिनिटे बर्फ लावा. पावसाळ्यात तुमची त्वचा तेलकट होत असल्यास हा फेस मास्क रामबाण उपाय आहे. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातात.

कोरफड

कोरफड ही औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदातही कोरफडला मोठे महत्व आहे. कोरफडीचे फेस मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात कोरफड जेल , थोडा लिंबाचा रस घालून छान मिक्स करून घ्या. या फेस मास्कचा हाताने चेहऱ्यावर मसाज करा. या फेशियलमुळे त्वचेला ग्लो येतो. तसेच त्वचा मॉइश्चरायझर होते.

दुधाची साय

दूध शरीरासोबत त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. दुधातील पोषक घटक त्वचेचे तारुण्य जपण्यास मदत करतात. पावसात दमट हवामानामुळे त्वचेवर वाईट परिणाम होताना दिसून येते. अशावेळी तुम्ही दुधाची सायपासून फेशियल करून शकता. दुधाची सायचे फेस मास्क बनवण्यासाठी दुधाची ताजी साय एका भांड्यात काढून त्यात चिमूटभर हळद घाला. मिश्रण छान एकजीव करून घ्या. हे फेसपॅक चेहऱ्यावर २० ते २५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. दुधाच्या सायमुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्सची संख्या कमी होते.

मुलतानी माती

तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती ही फायदेशीर आहे. मुलतानी माती त्वचेवर तेल निर्मिती करणाऱ्या ग्रंथी नियंत्रणात आणते आणि त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाते. मुलतानी मातीचा फेस मास्क तयार करण्यासाठी एका भांड्यात मुल्तानी माती, गुलाब पाणी आणि थोडी हळद टाकून घ्यावी. रात्री झोपण्यापूर्वी हा फेस मास्क लावा आणि ३० मिनिटांनी थंड पाण्याने धुवून चेहरा स्वच्छ करा. यामुळे पावसात होणारी कोरडी त्वचा मुलायम होते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT