Monsoon Diarrhea Problem In Kids saam Tv
लाईफस्टाईल

Monsoon Special: पावसाळ्यात मुलांचे पोट बिघडले? तर डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश लगेच करा

Diarrhea Prevention Tips : आजकाल पोटदुखी व त्याच्या इतर समस्या या सामान्य वाटत असल्या तरी आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो.

कोमल दामुद्रे

Diarrhea Prevention Tips:

हल्ली मुलांना घराच्या पदार्थांपेक्षा बाहेरचे पदार्थ खाण्याची जास्त आवड असते. त्यातील त्यात जंक फूड जरा जास्तच. पावसाळा म्हटलं की, मुलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या ऋतूमध्ये अनेक आजार डोकीवर काढतात.

आजकाल पोटदुखी व त्याच्या इतर समस्या या सामान्य वाटत असल्या तरी आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. पावसाळ्यात जिवाणूंची वाढ सहज आणि वेगाने होते. त्यामुळे या ऋतूत अधिक सावधगिरी बाळगावी लागते. अतिसारामुळे मुलांमध्ये डिहायड्रेशनची समस्या वाढते. ही समस्या टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊया.

1. पावसाळ्यात (Monsoon) अतिसारापासून मुलांना कसे वाचवायचे?

  • अतिसार टाळण्यासाठी मुलांना (Kids) त्यांचे हात व्यवस्थित धुण्यास शिकवा.

  • जेवण्यापूर्वी आणि बाथरूममध्ये गेल्यावर हात धुण्याची सवय लावा.

  • मुलांना स्ट्रीट फूड खाऊ देऊ नका. त्यांना घरी ताजे अन्न शिजवून खायला द्यावे.

  • मुलांना गोठलेल्या किंवा घाणेरड्या पाण्याने खेळू देऊ नका. त्यामुळे डेंग्यूचा धोका वाढतो.

  • पिण्यासाठी पाणी उकळवा किंवा वॉटर प्युरिफायरचे पाणी मुलांना द्या.

  • मुलांना अतिसारापासून वाचवण्यासाठी घरात स्वच्छता ठेवा. विशेषत: बाथरूम आणि स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा.

2. अतिसार टाळण्यासाठी मुलांच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

  • पावसाळ्यात मुलांच्या आहारात (Health) हंगामी फळे, भाज्या, काजू, बिया इत्यादींचा समावेश करा.

  • लहान मुलांच्या आहारात दह्याचा समावेश करावा. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

  • पावसाळ्यात गरम आणि ताजे घरगुती अन्न खा. बाहेरील जंक फूडचे सेवन कमी करा.

  • पचन सुधारण्यासाठी जिरे, हिंग, आले आणि धणे यांसारख्या पदार्थांचा अधिक वापर करा.

3. घरी अतिसाराचा उपचार कसा कराल?

  • जर मुलाला अतिसाराचा त्रास होत असेल तर त्याला द्रव आहार द्या, तसेच पाणी पिणे चालू ठेवा, कारण या काळात शरीरात पाण्याची कमतरता होते.

  • मुलांना ओआरएस सोल्यूशन दिले जाऊ शकते.

  • मुलांना अतिसार झाल्यास केळी, भात, दही आणि सफरचंद खायला द्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT