Monsoon Car Tips Saam tv
लाईफस्टाईल

Monsoon Car Driving Tips: पावसाळ्यात कार घेऊन फिरायला जाताय ? ड्राइव्ह करण्यापूर्वी या गोष्टी तपासून मगच घराबाहेर पडा !

Monsoon Driving Tips : पावसाळ्यात कार चालवताना आपण काय काळजी घ्यायला हवी.

कोमल दामुद्रे

Car Care Tips : पावसाळ्यात आपण जितकी आरोग्याची काळजी घेतो तितकीच आपल्याला आपल्या वाहनांची देखील काळजी घ्यायला हवी. अनेकदा आपण फिरण्यासाठी किंवा काही कामानिमित्त पावसाळ्यात कार घेऊन घराबाहेर पडतो. हवामानाचा अंदाज नसल्यामुळे आपण घराबाहेर पडतो तर खरे पण पावसात अडकतो.

परंतु, पावसाळ्यात कार चालवताना आपण काय काळजी घ्यायला हवी. तसेच पावसाळ्यात तुमची कार चालवण्या योग्य आहे का हे तपासावे. अशाच काही गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने आपले ड्राइव्ह अधिक सुखकर होईल.

1. टायर

पावसाळा (Monsoon) सूरु होण्यापूर्वी कारची सर्व्हिंसिंग एकदा करा. टायरची पकड चांगली नसेल तर पावसात ओले रस्ते धोकादायक ठरु शकतात. म्हणून घराबाहेर पडताना कारचे टायर एकदा चेक करु घ्या. तसेच एक्स्ट्रा टायर देखील सोबत ठेवा.

2. वायपर

विंडशील्ड (windshield) वायपरशिवाय पावसात कार चालवणे अवघड आहे. वायपर हे कारवर पडणारे पाणी स्वच्छ करते ज्याच्या मदतीने आपल्याला समोरचा रस्ता धूसर दिसत नाही. पावसाळ्यात वायपरचे रबर एकदा चेक करुन घ्या

3. लाइट्स

घराबाहेर पडण्यापूर्वी कारचे हेडलाइट्स तपासून घ्या. कधी कधी पावसाचे पाणी हे हेडलाट्समध्ये गेल्यामुळे त्याचा प्रकाश कमी होतो व आतील बल्ब खराब होतो.

4. ब्रेक्स

कारचे (Car) ब्रेक हे नेहमीच महत्त्वाचे असतात. फक्त पावसाळ्यात नाही तर नेहमीच आपल्याला कारचे ब्रेक्स तपासायला हवे. ब्रेकचा आवाज येत असल्यास किंवा ते कडक झाल्यास त्याची दुरुस्त करुन घ्यायला हवे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT