लाईफस्टाईल

Breast milk: ब्रेस्ट मिल्क पंपिंगबाबत महिलांच्या मनात असलेले गैरसमज; स्तनपानावर होतो का परिणाम?

breast milk pumping misconceptions: अनेक महिलांना स्तनपान करताना दूध काढण्याबाबत विविध शंका आणि गैरसमज असतात. काहींना वाटते की दूध काढल्याने स्तनपानावर परिणाम होतो, तर काहींना वाटते की त्यामुळे दूध कमी होते. मात्र तज्ज्ञांच्या मते हे सर्व गैरसमज आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

प्रसुतीनंतर काही आठवड्यांनी आई पुन्हा कामावर जाण्याचा किंवा काही वेळ बाळाला घरी ठेवून बाहेर जाण्याचा विचार करते. अशावेळी सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे बाळाला कसं दूध पाजायचं? यासाठी ब्रेस्ट पंप हा एक उपयुक्त पर्याय ठरतो. पंपिंगमुळे दूध व्यवस्थित साठवता येतं आणि शरीराला अधिक दूध तयार करण्याचा सिग्नलही मिळतो.

अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुमित परांजपे यांनी सांगितलं की, ब्रेस्ट पंपिंगबद्दल अनेक चुकीच्या समजुती आहेत, ज्यामुळे मातांना काहीवेळा भीती वाटते. अशावेळी कोणत्या गैरसमजुती आहेत ते पाहूयात.

गैरसमज १: पंपिंग म्हणजे बाळाला नीट स्तनपान मिळत नाही

वास्तविकता: थेट स्तनपान असो किंवा पंप करून दिलेलं दूध असो दोन्ही बाळासाठी सारखेच पोषक असतं. पंपिंगमुळेही बाळाला रोगप्रतिकारशक्ती मिळण्यास मदत होते. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. काम, आरोग्य किंवा इतर कारणांमुळे थेट स्तनपान शक्य नसलं तरी पंपिंगमुळे आई स्तनपान सुरू ठेवू शकते.

गैरसमज २: पंपिंगमुळे दुधाची पोषकता कमी होते

वास्तविकता: पंप करून साठवलेलं दूध थेट स्तनपानाइतकंच पोषक असतं. त्यामध्ये अँटीबॉडीज, प्रोटीन, चरबी आणि जीवनसत्त्वं तशीच राहतात. फक्त दूध योग्य प्रकारे साठवणं आणि स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

गैरसमज ३: ब्रेस्ट पंप वापरणं वेदनादायक असतं

वास्तविकता: योग्य आकाराचा पंप, योग्य सक्शन आणि योग्य तंत्र वापरल्यास पंपिंग वेदनादायक ठरू शकत नाही. आधुनिक पंप नैसर्गिक स्तनपानासारखाच अनुभव देतात. त्यामुळे मातांनी ताण घेण्याची गरज नाही. तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार, पंप वापरल्यास कोणतीही अडचण येत नाही.

गैरसमज ४: पंपिंगमुळे दूध कमी होतं

वास्तविकता: हे चूक आहे. खरं तर नियमित पंपिंगमुळे शरीराला अधिक दूध तयार करण्याचा संकेत मिळतो. मात्र पंपिंग सत्र चुकवणे, चुकीचा फ्लेंज वापरणं किंवा चुकीचं तंत्र वापरणं यामुळे दूध कमी होऊ शकतं. म्हणून तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एसटी डेपोत 'मद्यधुंद' कारभार; रेस्ट रूममध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या, मंत्री प्रताप सरनाईक संतापले अन्...

Maharashtra Live News Update: संजय राऊत यांना महाराष्ट्राची संस्कृती आणि प्रोटोकॉल माहीत नाही संजय शिरसाट

Maharashtra Politics: 'तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा', शिंदेंच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान

Shocking : धक्कादायक! पिझ्झा शॉपमध्ये डेटला गेले, जातीवरून हिणवलं; प्रेमी युगुलांनी थेट दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी

Phone Battery Care: बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगवरुन फोन काढायचा?

SCROLL FOR NEXT