AI Gave Birth to a Baby Saam Tv News
लाईफस्टाईल

AI : तंत्रज्ञानाचा चमत्कार, AI ने दिला बाळाला जन्म; वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा

AI Gave Birth to a Baby : जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं, ते आता यंत्रेही करू शकतात. एक ऐतिहासिक चमत्कार घडलाय. नेमकं काय घडलंय पाहूया एक खास रिपोर्ट.

Girish Nikam

गिरीश निकम, साम टीव्ही

विज्ञानाच्या कथा आता प्रत्यक्षात उतरत आहेत! जे काम आतापर्यंत फक्त अनुभवी डॉक्टरांच्या हातून होत होतं, ते आता यंत्रेही करू शकतात. असाच एक ऐतिहासिक चमत्कार नुकताच घडला आहे. जगात पहिल्यांदा पूर्णपणे स्वयंचलित IVF सिस्टीम आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजेच AIच्या मदतीने एका बाळाचा जन्म झाला आहे. चला, जाणून घेऊया हा चमत्कार कसा घडला.

मेक्सिकोच्या ग्वाडलाजारा शहरात ही घटना घडली. एका 40 वर्षीय महिलेने AI-सहाय्यित IVF प्रक्रियेद्वारे निरोगी बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे, या प्रक्रियेत माणसाच्या हाताऐवजी यंत्रांनी ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. हे विशेष..ही प्रक्रिया नेमकी कशी होती ते पाहू

ICSI म्हणजेत Intracytoplasmic Sperm Injection) या तंत्रामध्ये साधारणपणे तज्ज्ञ एक-एक शुक्राणू अंड्यात सोडले जातात. पण यात थकवा किंवा मानवी चुकांची शक्यता असते. न्यूयॉर्क आणि मेक्सिकोच्या शास्त्रज्ञांनी मिळून एक पूर्णपणे स्वयंचलित सिस्टीम तयार केली आहे. ही सिस्टीम AI आणि डिजिटल नियंत्रणाने 23 टप्प्यांची प्रक्रिया पार पाडते. यंत्राने शुक्राणू निवडले. लेझरने निष्क्रिय केले आणि अंड्यामध्ये टोचले. प्रत्येक अंड्यासाठी फक्त 9 मिनिटं 56 सेकंद लागले!

तंत्रज्ञानामागे काम करणारे प्रमुख भ्रूण तज्ञ डॉ. जैक्स कोहेन यांच्या मतानुसार "हे तंत्रज्ञान IVF मध्ये क्रांती आणेल. या प्रक्रियेत पाचपैकी चार शुक्राणू यशस्वीपणे फलित झाली. त्यापैकी एक निरोगी भ्रूण तयार करून गोठवण्यात आला आणि नंतर ट्रान्सफर केला, ज्यामुळे बाळाचा जन्म झाला. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी वेगवान आणि प्रभावी होईल. यामुळे IVF चा खर्च कमी होऊ शकतो, यशस्वीतेचा दर वाढू शकतो आणि जगभरातील लाखो दांपत्यांना संतानप्राप्तीची नवी आशा मिळू शकते. त्यामुळे हा फक्त एक जन्म नाही, तर विज्ञानाच्या नव्या युगाची सुरुवात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT