Meta News saam tv
लाईफस्टाईल

Meta News : फेसबुक-इन्स्टामुळे मुलांचं मानसिक स्वास्थ्य संकटात; 41 राज्यांकडून 'मेटा'वर न्यायालयात खटला दाखल

Social Media Side Effects : सध्या मोठ्यांपेक्षा लहान मुले याचा अधिक वापर करताना दिसून येत आहे.

कोमल दामुद्रे

Child Addicted To Social Media :

फेसबुक इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅप्सने प्रत्येक वयोगटातील मुलांना आपल्या विळख्यात ओढलं आहे. सध्या मोठ्यांपेक्षा लहान मुले याचा अधिक वापर करताना दिसून येत आहे.

या अॅप्सच्या माध्यमातून येणारे नवीन फीचर्स मुलांना आकर्षित करतात. ज्यामुळे मुलांना सतत सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे असा आरोप अमेरिकेतील अनेक पालकांनी केला आहे. मुले खेळण्याच्या वयात सतत मोबाइलवरती फेसबुक-इन्स्टा पाहात असतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यामुळे त्यांच्या डोळ्यांसोबत (eye) मानसिक आरोग्यावर (Mental Health) परिणाम होताना दिसून येत आहे. अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी सह ४१ राज्यांनी मेटा कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तब्बल २३३ पानांच्या फेडरल तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, कंपनी आपल्या फायद्यासाठी हे अॅप्स अधिक व्यसनाधीन बनवते. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो.

कोलोराडो, कॅलिफोर्निया आणि इतर ३३ राज्यांनी कॅलिफोर्नियातील फेडरल न्यायालयात खटला दाखल केला आहे. तसेच वॉशिंग्टन डीसी आणि इतर ८ राज्यांच्या अ‍ॅटर्नी जनरल यांनी स्थानिक न्यायलयांमध्ये अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत.

मेटा (Meta) कंपनी लहान मुलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक नवनवीन फीचर्स लॉन्च करत असते. यातील कंटेट मुलांना असे आकर्षित करतात ज्यामुळे मुले दिवसभर त्या अॅप्सचा वापर करतात. यासाठी कंपनी कंझ्युमर प्रोटेक्शन नियमाचं उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT