PM Kisan 15th Installment Date 2023 : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! पीएम किसानचा 15 वा हप्ता या तारखेला मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

PM Kissan Yojana Money : किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojana Saam Tv
Published On

PM Kisaan Yojana Installment :

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी जुलै महिन्यात शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते १४ वा हफ्ता जारी करण्यात आला होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीएम (PM)-किसान योजनेअंतर्गत जे शेतकरी हप्त्यासाठी पात्र आहेत त्यांना दर चार महिन्याला २००० रुपये मिळतात. जे वार्षिक उत्पन्नात ६००० रुपये होते. हा हप्ता दरवर्षी एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. सरकारने (Government) आतापर्यंत एकूण २.५० लाख कोटी रुपये पीएम-किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दिले आहेत.

PM Kisan Yojana
Most Famous Place In Pune : कपल्सला भुरळ घालणारे पुण्यातील सुंदर रत्न, निसर्गरम्य दृश्य पाहून प्रेमात पडाल!

पीएम-किसान योजनेचा या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

1. सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. होम पेजवर दिसणाऱ्या Know Your Status च्या पर्यायावर क्लिक करा. नोंदणी क्रमांक टाका.

3. नोंदणी क्रमांक माहित नसल्यास तो जाणून घेण्यासाठी पर्यायावर क्लिक करा. मोबाइल (Mobile) नंबर एंटर करा नंतर कॅप्चा टाका.

4. मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP मिळेल. OTP टाकल्यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल.

5. त्यानंतर Know Your Status वर क्लिक करून नोंदणी क्रमांक टाका.

6. तुम्हाला PM किसान सन्मान निधी योजनेत नाव पाहायचे असेल तर https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटला भेट द्या.

7. यानंतर, उजव्या बाजूला दिसणाऱ्या लाभार्थीच्या पर्यायावर क्लिक करा. त्यात तुमचे राज्य,जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.

8. यानंतर, तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्या सर्व लोकांची नावे दिसतील.

9. जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अर्ज केला असेल. त्याची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही १५५२६१ वर कॉल करू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com