Meta Launch Thread App Saam Tv
लाईफस्टाईल

Meta Launch Thread App : मेटाची Twitter ला टक्कर ! Threads अ‍ॅप लॉन्च; कसे कराल डाउनलोड

How To Download Threads App : लोकप्रिय सोशल मीडिया कंपनी मेटाने मायक्रोब्लॉगिंग अॅप Threads लॉन्च केले आहे.

कोमल दामुद्रे

Threads VS Twitter : लोकप्रिय सोशल मीडिया कंपनी मेटाने मायक्रोब्लॉगिंग अॅप Threads लॉन्च केले आहे. हा अॅप ट्विटरसारखा असणार आहे. या अकाउंटला आपण इन्स्टाग्रामच्या आयडीने साइन-अप किंवा लॉग इन करु शकतो.

हे अॅप लॉन्च झाले असून ट्विटरला टक्कर देणार आहे. त्यामुळे मेटा व ट्विटरमध्ये चांगलीच जुंपणार आहे. Meta दीर्घकाळापासून थ्रेड्स अॅपवर काम करत होते आणि आता ते Android आणि iOS प्लॅटफॉर्मवरील सर्व वापरकर्त्यांसाठी लॉन्च करण्यात आले आहे.

तसेच, या अॅपमध्ये (App) खाते तयार करण्यासाठी वापरकर्त्यांना अधिक जास्त प्रोसेस करण्याची गरज नाही. यामध्ये आपण इन्स्टाग्राम (Instagram) अकाउंटवरुन लॉग इन करु शकतो. अॅपचा इंटरफेस Instagram द्वारे प्रेरित आहे आणि वैशिष्ट्ये Twitter सारखीच आहेत.

1. कसे कराल डाउनलोड

  • नवीन थ्रेड्स अॅप Google Play Store आणि Apple App Store या दोन्हीवर आहे त्यावरुन आपण डाउनलोड करु शकतो.

  • Play Store किंवा App Store वर गेल्यानंतर आणि शोध विंडोमध्ये Instagram द्वारे थ्रेड्स शोधल्यानंतर, तुम्हाला अॅप्सची सूची दिसेल.

  • यासाठी आपल्याला थ्रेड्स हे इन्स्टाग्राम अॅप डाउनलोड करावे लागेल.

  • या अॅपचे आयकॉन '@' या चिन्हासारखे असून ते इन्स्टाग्रामने विकसित केले आहे.

2. कशी असेल प्रोसेस

  • थ्रेड्स अकाउंट अॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही ते ओपन करताच तुम्हाला इन्स्टाग्रामच्या मदतीने लॉग इन करण्याचा पर्याय दिला जाईल.

  • जर तुमचे इस्टाचे अकाउंट असेल तर तुम्हाला त्यात फक्त दिलेल्या प्रोसेसवर टॅप करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचे आहे व आपले प्रोफाइल सेट करायचे आहे.

  • तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही इंस्टाग्रामवरून प्रोफाईल बायो आणि लिंक्सची माहिती सारखीच ठेवू शकता

  • शेवटी 'Join Threads' वर टॅप केल्यानंतर, तुम्ही ते वापरण्यास सक्षम व्हाल.

3. ट्विटरला कशी द्याल टक्कर

  • ट्विटरचा ताबा एलोन मस्ककडे आल्यापासून त्यात अनेक बदल करण्यात आले आहे. जे युजर्सला आवडले नाही.

  • तसेच यामध्ये युजर्सला दररोज किती ट्विट पाहू शकतात तसेच यावर मर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. लॉग इन न करता ट्विट पाहण्याचा पर्याय देखील काढून टाकण्यात आला आहे.

  • थ्रेड्स अॅप एक नवीन पर्याय बनू शकतो. तसेच यामध्ये थ्रेडला रीशेअर, लाईक किंवा शेअर करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT