Budh gochar saam tv
लाईफस्टाईल

Budh Gochar: जानेवारी महिन्यात दोन वेळा गोचर करणार बुध ग्रह; नववर्षात 'या' राशींना लागणार लॉटरी

Budh Gochar 2025: बुधाच्या गोचरमुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होणार आहे. अशा स्थितीत 3 राशींवर बुधाच्या गोचरचा प्रभाव शुभ परिणाम होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीत बदल करतात, असं ज्योतिष्य शास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्ष 2025 मध्ये नऊ ग्रह विविध काळात गोचर करणार आहेत. ज्यामुळे परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होणार आहे.

ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 2025 च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारीमध्ये दोन वेळा त्याच्या राशीमध्ये बदल करणार आहे. यावेळी बुधाच्या गोचरमुळे सर्व राशींच्या व्यक्तींवर काही ना काही परिणाम होणार आहे. अशा स्थितीत 3 राशींवर बुधाच्या गोचरचा प्रभाव शुभ परिणाम होणार आहे. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींवर याचा परिणाम होणार आहे.

जानेवारी 2025 मध्ये, ग्रहांचा राजकुमार बुध दोनदा आपली राशी बदलेल. या महिन्यात बुध धनु आणि मकर राशीत प्रवेश करणार आहे. 4 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12:11 वाजता बुध धनु राशीत तर 24 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5:45 वाजता मकर राशीत प्रवेश करेल.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचं गोचर फलदायी राहणार आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळणार आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकतं. नातेसंबंध सुधारू शकतात. आत्मविश्वास पूर्वीपेक्षा चांगला राहील आणि तुम्ही प्रत्येक कामात यश मिळवू शकाल. जोडीदारासोबत कुठेतरी प्रवासाची योजना आखू शकता. नवीन कामात रुची वाढणार आहे.

कर्क रास

कर्क राशीसाठी बुधाचं गोचर लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा वेळ चांगला जाणार आहे. व्यावसायिकांसाठी काळ पूर्वीपेक्षा चांगला जाणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांहून ऑफर मिळू शकतात.

मकर रास

मकर राशीसाठी बुधाचं गोचर लाभदायक ठरणार आहे. आर्थिक संकटातून सुटका मिळू शकणार आहे. सामाजिक कार्यात विशेष रुची वाढणार आहे. प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढल्याने व्यवसायातही प्रगती होणार आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT