Irregular Periods
Irregular Periods Saam Tv
लाईफस्टाईल

Irregular Periods : मासिक पाळी ४० दिवसानंतर आली ? चिंतेचे कारण की, गंभीर समस्या

कोमल दामुद्रे

Irregular Periods : मासिक पाळी ही वयाच्या ११ किंवा १२ वर्षानंतर प्रत्येक मुलींला येणारी सामान्य गोष्ट आहे. वयोमानानुसार यात बदलही होत जातात.

मासिक पाळीचे चक्र हे २६ ते २८ दिवसांचे असते, काही वेळा ही लवकर येते तर काही वेळा ही ५ ते ६ दिवस उशीरा. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी व जीवनशैलीच्या (Lifestyle) बदलांमुळे ही समस्या उद्भवू शकते.

काही स्त्रियांच्या वयोमानानुसार ही समस्या हळू हळू कमी होऊन मासिक पाळी काही वयानंतर येण्यास बंद होते. परंतु, तरुण वयातील मुलींना या समस्येसा विळखा बनावा लागतो. मासिक पाळी उशीरा आल्यानंतर त्याचा शरीरावर व मनावर फारसा परिणाम होताना दिसून येतो.

मासिक पाळी ४० दिवसानंतर आली तर, घाबरण्याचे कारण नाही. परंतु, ती जास्तीत जास्त ३ ते ७ दिवस पुढे जाऊ शकते. अर्थातच ती २१ ते ३५ दिवसाचा हा कालावधी होऊ शकतो. हा त्रास आपल्या वारंवार होत असेल तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

खरेतर ४० दिवसानंतर मासिक पाळी येणे हे सामान्य लक्षण नाही. ऑलिगोमोनोरियामुळे हार्मोनल असामान्यता आणि वजन वाढू शकते. याचा परिणाम आपल्या प्रजनन क्षमतेवर देखील होऊ शकतो. आपण या समस्येसा सामना करत असू तर आपण वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अनियमित मासिक पाळीचे कारण काय ?

१. पीसीओडी-

पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD) हा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होतो. स्त्रीच्या अंडाशयात पुरुष संप्रेरके एन्ड्रोजेन्स वाढतात आणि उत्सर्जित होतात ज्यामुळे एखाद्याची प्रजनन क्षमता कमी होते. पीसीओडीच्या काही सामान्य परिणामांमध्ये वजन वाढणे, केस गळणे आणि अनियमित मासिक पाळी यांचा समावेश होतो.

२. हार्मोन्सवर उपचार -

जर आपण गर्भनिरोधक इंजेक्शन्स किंवा उपचार घेत असू तर मासिक पाळीच्या नियमिततेसाठी ही समस्या अधिक त्रासदायक ठरू शकते. यामुळे शरीर सतत जड वाटू शकते, सतत झोप येऊ शकते.

३. पेरीमेनोपॉज-

पेरीमेनोपॉज, ज्याचा अर्थ 'रजोनिवृत्तीच्या आसपास' असा होतो, जेव्हा आपले शरीर रजोनिवृत्तीमध्ये बदलते, तेव्हा आपली मासिक पाळी थांबते. या काळात आपले शरीर कमी ओव्हुलेशन हार्मोन्स तयार करत असल्याने आपली मासिक पाळी अनियमित होऊ शकते.

४. थायरॉईड -

महिलेची प्रजनन प्रणाली थायरॉईड संप्रेरकांवर अवलंबून असते आणि हायपरथायरॉईडीझमची केस मासिक पाळीच्या अनियमिततेवर परिणाम करू शकते. जर थायरॉईडमुळे आपली मासिक पाळी काही महिने थांबली, तर याला अमेनोरिया म्हटले जाते. त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

५. लठ्ठपणा -

अनेक आरोग्याच्या (Health) समस्यांचे मूळ कारण आहे लठ्ठपणा. हे अनियमित मासिक पाळीशी देखील संबंधित आहे आणि स्त्रीच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करू शकते. स्त्रीचे वजन वाढते तेव्हा शरीरात इस्ट्रोजेन जास्त प्रमाणात निर्माण होते. इस्ट्रोजेन हे मासिक पाळीचे नियमन करणाऱ्या संप्रेरकांपैकी एक आहे आणि त्यामुळे मासिक पाळीच्या नियमिततेवर किंवा त्याची कमतरता यावर त्याचा थेट परिणाम होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor : परम सुंदरी; जान्हवी कपूरच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या...

Today's Marathi News Live: काँग्रेसच्या माजी नगरसेविका मीरा पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश

Abhishek Ghosalkar: हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनेचे सर्व CCTV फुटेज कुटुंबियांना दाखवा: हायकोर्ट

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Sonalee Kulkarni : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

SCROLL FOR NEXT