When to do heart checkup saam tv
लाईफस्टाईल

Men's health checkup: वयाच्या पन्नाशीनंतर पुरुषांनी 'या' चाचण्या करूनच घ्याव्यात; या गोष्टींवर लक्ष ठेवा

Annual checkup essential tests: आजच्या धावपळीच्या जीवनात पुरुष आपल्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. परंतु, ५० वर्षांची (Age of Fifty) वेस ओलांडल्यावर शरीरातील नैसर्गिक बदल, जीवनशैली आणि ताणामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि आपले वय वाढत जाते तशा आपल्या शारीरिक आरोग्यात लक्षणीय बदल होत जातात. स्त्रियांच्या आरोग्यावर बरीच चर्चा होत असली, तरी पुरुषांमधील वयाशी निगडित समस्यांबाबत तुलनेने मर्यादित जागरूकता दिसते. वयाची ५० वर्षे पूर्ण केल्यानंतर अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो, यांमध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, प्रोस्टेटच्या समस्या तसेच प्रोस्टेट व कोलोरेक्टल यांच्या कॅन्सरचा समावेश होतो.

मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेडच्या डॉक्टर इन-चार्ज व कन्सल्टण्ट – हिस्टोपॅथोलॉजिस्ट डॉ. शीतल मुंडे यांनी सांगितलं की, दुर्दैवाने बहुतेक पुरुष वयाशी निगडित क्षुल्लक समस्या म्हणून सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात किंवा नियमित तपासण्या करून घेत नाहीत. मात्र, या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर किंवा अगदी प्राणघातक परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. वयाची निगडित बहुतेक आजार अचानक होत नाहीत ते हळूहळू वाढत जातात आणि नियमित तपासण्यांच्या माध्यमातून अगदी सुरुवातीच्या टप्प्यांवर त्यांचे निदान होऊ शकतं. लवकर निदान झाल्यास वेळेत उपचार होऊ शकतात आणि गंभीर स्वरूपाची गुंतागूंत निर्माण होणे टाळले जाऊ शकते.

गंभीर स्वरूपाचे हृदयविकार आणि हायपरटेन्शन

हृदयविकार आणि उच्च रक्तदाब हे वयस्कर प्रौढांमध्ये सर्वाधिक आढळणारे गंभीर स्वरूपाचे आजार आहेत. बहुतेकदा या आजारांसोबत मधुमेहही आढळतो. या अवस्थांना ‘सायलेंट किलर्स असे म्हटले जाते. कारण या अवस्था हळूहळू तीव्र होत जातात आणि अगदी गंभीर टप्प्यावर पोहोचल्यानंतरच यांची लक्षणे जाणवतात. रक्तदाब, कोलेस्टरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी यांच्यावर नियमित लक्ष ठेवल्यास यासंदर्भातील आजारांचे निदान लवकर होण्यात मदत होते आणि त्यांचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने करता येते.

मधुमेह

वाढतं वय हा मधुमेहाच्या दृष्टीने मोठा धोक्याचा घटक असतो. रक्तातील साखरेच्या पातळीवर नियमित देखरेख ठेवल्यास मधुमेहपूर्व अवस्थेचे निदान होते किंवा मधुमेहाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर होऊ शकते. त्यामुळे तो वेळेत नियंत्रणात आणला जाऊ शकतो आणि गुंतागूंत निर्माण होण्याचा धोका कमी होतो.

कॅन्सरचा धोका

पन्नाशीनंतर विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा विशेषत: प्रोस्टेट कॅन्सरचा धोका पुरुषांमध्ये लक्षणीयरित्या वाढतो. वारंवार लघवीला जावं लागणं, लघवीतील बदल हे सर्व कॅन्सरमुळेच होते असं नाही, तर यांचा संबंध प्रोस्टेटचे आकारमान वाढणे किंवा प्रादुर्भावांशीही असू शकतो. हे सर्व नियमित तपासणीच्या माध्यमातून सहज समजू शकते. कोलोरेक्टरल कॅन्सरही वयस्कर पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो.

मूत्रपिंडाचे गंभीर स्वरूपाचे विकार

हायपरटेन्शन आणि मधुमेह दीर्घकाळ राहिल्यास किडनीच्या कार्यात हळूहळू बिघाड होत जातो, त्यातून सीकेडी किंवा किडनीचं कार्य थांबणं यांसारखे आजार होतात. किडनीचं कार्य तपासण्यासाठी नियमितपणे रक्त आणि लघवीच्या चाचण्या केल्यास त्यांतील अपसामान्यता सुरुवातीच्या टप्प्यावरच लक्षात येऊ शकतात, त्यामुळे हे विकार बळावू नयेत म्हणून वेळीच तपासणी करणं गरजेचं आहे.

अस्थींचे विकार आणि हालचालींतील समस्या

ओस्टिओपोरोसिस ही आता केवळ स्त्रियांची समस्या समजली जात नाही. ५० वर्षांवरील पुरुषांमध्येही ओस्टिओपोरोसिसचा धोका वाढत आहे, त्यामुळे सांधेदुखी, हालचालींमध्ये अडचणी आणि हाडे मोडण्यासारख्या समस्या निर्माण होतात. हाडांची घनता तपासण्याची चाचणी केल्यास हा धोका सुरुवातीच्या टप्प्यावर लक्षात येतो आणि त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाय केले जाऊ शकतात.

दृष्टी आणि श्रवण क्षमता कमी होणं

मोतीबिंदू आणि अंतर्गत कानाच्या कार्यातील बिघाड यांमुळे दृष्टी व श्रवण यांवर परिणाम होतो. नियमित तपासणी करत राहिल्यास या समस्या लवकर लक्षात येतात आणि वेळेत उपचार करणे शक्य होते. शारीरिक आरोग्याच्या पलीकडे मानसिक आरोग्य ही समस्याही वयस्कर पुरुषांमध्ये वाढत आहे. नैराश्य, चिंता व संज्ञानात्मक ऱ्हास, यांत स्मरणशक्तीचा ऱ्हासही येतो. या समस्या मोठ्या प्रमाणात आढळतात पण त्यांकडे बहुतेकदा दुर्लक्ष केले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ वर अजून एक गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT