Medu Vada Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Medu Vada Recipe : चहाच्या गाळणीवर बनवा गोल टम्म फुगलेला मेदूवडा; वाचा परफेक्ट रेसिपी

Ruchika Jadhav

राज्यात अनेक व्यक्तींना साउथ इंडियन फूड फार आवडतं. हे पदार्थ अतिशय रुचकर आणि टेस्टी लागतात. त्यामुळे प्रत्येक जण यावर ताव मारतात. मेदूवडे बनवणे तितकसं कठीण नाही. अनेक महिला याचे पीठ व्यवस्थित भिजवतात. मात्र वड्यांमध्ये छिद्र आणि परफेक्ट गोल तयार करणे, तेलात सोडणे हे अनेक महिलांना जमत नाही. त्यामुळे आज मेदूवडे परफेक्ट पद्धतीने कसे बनवायचे याची माहिती जाणून घेणार आहोत.

साहित्य

उडीद डाळ - एक मोठी वाटी ७ तास भिजलेली

मिरची - १

आलं

कढीपत्ता - ५ पाने

तेल

पाणी

मीठ

कृती

सर्वात आधी तुम्हाला डाळ भिजत ठेवावी लागेल. डाळ किमान ७ तास तरी भिजली पाहिजे. त्यामुळे तुम्ही रात्री देखील डाळ भिजण्यास घालू शकता. तसेच सकाळी नाश्त्याला याचे वडे बनवू शकता. हे वडे बनवण्यासाठी सर्वात आधी डाळ मिक्सरला बारीक वाटून घ्या. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता, मिरची आणि अलं यांची पेस्ट मिक्स करा.

साहित्य व्यवस्थीत बारीक व्हावं म्हणून तुम्ही डाळ मिक्सरला बारीक करताना त्यात मिरची, आलं आणि कढीपत्ता टाकू शकता. हे मिश्रण झटपट बारीक होऊन तयार होतं. आता पुढे तयार पीठ एका मोठ्या वाटीत काढून घ्या. तुमचं पीठ जितकं असेल त्यापेक्षा थोडी मोठी वाटी घ्या. कारण पीठ आपल्याला फेटायचे आहे.

पीठ फेटताना तुम्ही हाताने किंवा केकसाठी वापरल्या जाणाऱ्या स्पुनने सुद्धा फेटू शकता. पिठामध्ये हवा गेल्यावर यात मीठ टाका. तसेच खाण्याचा सोडा आणि बेकींग पावडर मिक्स करा. पुन्हा किमान १० मिनिटे तरी हे बॅटर फेटत राहा. उडदाची डाळ चिकट असते. त्यामुळे या डाळीचे वडे बनवताना ते पीठ हाताला चिकटतं. त्यामुळे वडे तेलात निट सोडता येत नाहीत.

चहाच्या गाळणीवर मेदूवडे

त्यामुळे तुम्ही चहाच्या गाळणीवर मेदूवडे बनवू शकता. मेदूवडे तळण्यासाठी गॅसवर कढईत तेल तापण्यासाठी ठेवा. पुढे एका वाटीत पाणी आणि तेल घ्या. गाळणी या पाण्यात बुडवा. गाळणी ओली झाली की, तिच्या उलट्या बाजूवर पीठ ठेवा. बोटाने याला मधोमध एक छिद्र सुद्धा करा. अशा पद्धतीने तयार झाले तुचमे कुरकुरीत आणि टप्प फुगलेले मेदूवडे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Vidhan Sabha : बीडमध्ये शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी समोर; उमेदवारी कोणाला? पक्षप्रमुखासमोर असणार आव्हान

IND vs NZ : रोहित २, विराट ०, राहुल ०...'किवी'पुढे भारताचा ४६ धावांत सुपडा साफ, टीम इंडियाचं नेमकं चुकलं काय?

Nashik News: धक्कादायक! जन्माला आला मुलगा पण हातात दिली मुलगी, ४ डॉक्टरांसह ८ जणांविरोधात कारवाई

Jodhpur Tourism Places: जोधपूरमधील 'ही' खास पर्यटन स्थळे पाहिलीत का ?

Maharashtra Politics: तिकीटावरुन सख्ख्या भावांमधील संघर्ष टळला! भाजपच्या विद्यमान आमदाराची निवडणुकीतून माघार

SCROLL FOR NEXT