Besan Ladoo Recipe : दिवाळीला बनवा खमंग बेसनाचे लाडू; 'या' टिप्सने रेसिपी अजिबात चुकणार नाही

Diwali 2024 Besan Ladoo : बेसन लाडू बनवणे अगदी सोपं आहे. त्यामुळे आज योग्य प्रमाणासह याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
Diwali 2024 Besan Ladoo
Besan Ladoo RecipeSaam TV
Published On

नुकताच नवरात्रोत्सव संपला आहे. नवरात्र संपत नाही तोच याच महिन्यात दिवाळी सुद्धा सुरुवात होत आहे. दिवाळी या वर्षी फार लवकर आली आहे. १ नोव्हेंबरला लक्ष्मीपुजन आहे. तर २ नोव्हेंबरला दिपावली पाडवा आणि ३ तारखेला भाऊबीज आहे. त्यामुळे आजपासूनच काही घरांमध्ये दिवळीचे फराळ बनवण्याच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

Diwali 2024 Besan Ladoo
Puranpoli Recipe: घरच्या घरी बनवा सातारा स्टाईल पुरणपोळी,चव तोंडावर रेंघाळत राहील

दिवाळीचं फराळ म्हटलं की प्रत्येकाला हवंहवंसं वाटतं. दिवळीत बनवले जाणारे बेसनाचे लाडू अनेकांचे फेवरेट आहेत. हे लाडू चवीला अगदी टेस्टी लागतात. फक्त लाडू बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. त्यामुळे काही वेळा साहित्याचे प्रमाण चुकले की लाडू निट वळत नाहीत. अशात आज लाडूची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

बेसन पीठ - ५ वाटी

पिठी साखर - ५ वाटी

तूप - ४ वाटी

ड्रायफ्रूट्स - २ वाटी

कृती

बेसन लाडू बनवणे फार सोपं आहे. त्यासाठी सर्वात आधी बेसन पीठ एका पॅनमध्ये घ्या. पीठ मस्त भाजून घ्या. पीठ भाजताना तुम्ही जे पॅन किंवा कढई वापरता ते जास्त पातळ नसेल याची काळजी घ्या. कारण अशा भांड्यात पीठ लगेचच जळू शकते. त्यामुळे पीठ भाजताना जाड कढईचा वापर करा.

पीठ नुसते भाजायचे नाही. त्यामध्ये तूप देखील मिक्स करायचे आहे. पिठात तूप टाकल्यावर त्याच्या बारीक बारीक गाठी तयार होतात. त्यामुळे पीठ भाजत असतानाच चमचा किंवा उलथीच्या सहाय्याने तुम्हाला पिठाच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत. पिठात गाठी राहिल्यास लाडू वळता येत नाहीत.

पीठ भाजताना आणखी एक काळजी घ्या, ती म्हणजे गॅस स्लो ठेवा. गॅस अजिबात फास्ट करू नये. गॅस नेहमी स्लो आणि कमी ठेवावा. पीठ पूर्ण भाजून झाले की थंड होऊद्या. पीठ थंड झाल्यावर ते थोडे कडक होते. पीठ कडक झाले म्हणून घाबरू नका. पीठ फोडून घ्या आणि त्यात साखर मिक्स करा. तसेच नंतर त्यात ड्रायफ्रूट्स मिक्स करा. पुढे तयार पिठाचे गोल गरगरीत लाडू वळून घ्या.

Diwali 2024 Besan Ladoo
Mirchi Bhaji Recipe : अस्सल कोल्हापूरी मिरची! बाहेरून कुरकुरीत आतून मऊ; 'या' टिप्सने बनवा चटकदार रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com