Masala Shankarpali  Saam TV
लाईफस्टाईल

Masala Shankarpali : गरमागरम चहासोबत घ्या कुरकुरीत तिखट शंकरपाळ्यांचा आस्वाद; वाचा सिंपल रेसिपी

Masala Shankarpali Recipe : आज आम्ही तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहोत जी एकदा बनवली की अगदी महिनाभर तुम्ही चहा पिताना खाऊ शकता.

Ruchika Jadhav

सकाळी दिवसाची सुरुवात करताना प्रत्येकाला चहा लागतोच. चहाचा एक घोट घेतला तरी अगदी फ्रेश वाटतं. चहाबरोबर नाश्त्याला काही खाण्यासाठी असेल तर सकाळी पोट भरलेलं राहतं. मात्र रोज झटपट काही बनवण्यासाठी वेळ सुद्धा नसतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहोत जी एकदा बनवली की अगदी महिनाभर तुम्ही चहा पिताना खाऊ शकता.

आज आपण तिखट शंकरपाळ्या घरच्याघरी कशा बनवायच्या याची रेसिपी जाणून घेणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आणि योग्य प्रमाण तसेच तेल व्यवस्थित घेतले की शंकरपाळी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते.

साहित्य

मैदा पीठ - 2 कप

गहू पीठ - 1 कप

जिरे - 2 चमचे

हिंग - 1 चमचा

चिली फ्लेक्स

तीळ

मीठ

पाणी

तेल

कृती

सर्वात आधी एका मोठ्या ताटात मैदा आणि गव्हाचे पीठ घ्या. त्यानंतर गॅसवर थोडे तेल कडकडीत गरम करून घ्या. तेल गरम झालं की या गरम तेलाचं मोहन पिठात टाकून घ्या. पिठात तेल टाकलं की ते थंड झाल्यावर संपूर्ण पिठात एकजीव करून मिक्स करा.

त्यानंतर यामध्ये जिरे, हिंग, तीळ आणि चीलिफलेक्स टाकून घ्या. तसेच पुढे चवीनुसार मीठ सुद्धा मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून याची छान कणीक मळून घ्या. कणिक मळून झाल्यावर हे पीठ किमान 20 ते 25 मिनिटे तसेच झाकून ठेवा.

पुढे या पिठाची छान चपाती लाटा. चपाती जास्त पातळ नको आणि जास्त जाड पण नको. मध्यम आकारात लाटून घ्या. त्यानंतर चक्र असलेल्या चमच्याच्या साहाय्याने यामध्ये त्रिकोण बनवून घ्या. एक एक करून संपूर्ण पिठाच्या अशा शंकरपाळ्या बनवून घ्या.

त्यानंतर कढईत तेल तापण्यासाठी ठेवा. तेल चांगलं तापलं की त्यात एक एक करून सर्व शंकरपाळ्या बारीक गॅसवर तळून घ्या. तळलेल्या शंकरपाळ्या एका हवा बंद डब्ब्यात भरून ठेवल्यावर त्या अगदी 15 दिवस सुद्धा चांगल्या राहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT