Maruti S Presso Saam Tv
लाईफस्टाईल

Offer on Maruti S Presso: मारूतीच्या तगड्या कारवर ५० हजारांहून अधिक सूट, सॉलिड लूक आणि तुफान मायलेज

Latest offer on Maruti Car : मारुतीच्या एस प्रेसो कारवर जबरदस्त सूट देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Huge Offer on Maruti S Presso Car:

मारुती सुझुकी ही कंपनी कारच्या उत्कृष्ट मायलेजसाठी ओळखली जाते. कंपनीच्या कार ग्राहकांसाठी नेहमीच नवीन कार लाँच करत असते. कंपनीच्या कारमध्ये अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. यातील एक कार म्हणजे 'मारुती सुझुकी एस प्रेसो'.

एप्रिल महिन्यात मारुती सुझुकी एस प्रेसो कार लाँच करण्यात आली होती. या कारमध्ये सात रंग आणि चार वेगवेगळे प्रकार आहे. कारची किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारवर आता मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात आली आहे.

मारुतीच्या या कारवर 54000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. मारुती सुझुकीच्या काही डिलरशिपमध्ये ऑक्टोबर महिन्यात ही ऑफर देण्यात आली आहे. ग्राहकांना कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेटमध्ये सूट दिली जाते. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

S-Presso पेट्रोल व्हेरियंटवर सूट

मारुती सुझुकी एस प्रेसो कारच्या पेट्रोल व्हेरियंटवर 30,000 रुपयांची रोख सूट मिळू शकते. तर या कारवर 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कोर्पोरेट सूट मिळू शकते. हॅचबॅकच्या CNG व्हेरियंटवर 30,000 रुपयांची रोख सूट आणि 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो.

मायलेज आणि इंजिन

मारुती सुझुकीची ही कार आकर्षक लूकसह बाजारात उपलब्ध आहे. कार ही पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. कार पेट्रोल व्हेरियंटमध्ये 24.76kmpl मायलेज देते. तर सीएनजी व्हेरियंटमध्ये 32.73km/kg मायलेज देते. या कारमध्ये K-Series 1.0 लीटर पेट्रोल देण्यात आले आहे. हे इंजिन 66bhp पॉवर आणि 89 मीटर टॉर्क जनरेट करु शकते. कारचं इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह एएमटी युनिटशी जोडलं गेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : जुन्या कसारा घाटात जव्हार फाट्याजवळ दरड कोसळली

Visapur Fort History: महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांपैकी विसापूर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Kalyan Rain : उल्हास नदीला पूर; पुलावरून पाणी वाहत असल्याने महामार्ग वाहतुकीस बंद

Highest egg consumption: कोणत्या देशात सर्वाधिक अंडी खाल्ली जातात?

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कल्याणमध्ये खिंडार, नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT