Maruti Suzuki Ertiga Saam Tv
लाईफस्टाईल

Maruti Suzuki Ertiga : स्वस्तात मस्त! दोन लाखांच्या डाउनपेमेंटमध्ये खरेदी करा मारुती सुझुकी, EMI हप्ता किती? वाचा डिटेल्स

कोमल दामुद्रे

Maruti Suzuki Ertiga EMI Offers :

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीची एर्टिगा ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ही कार खिशाला परवडणारी, सीएनजी पर्याय आणि एमपीव्ही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

जर तुम्ही देखील Ertiga खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमच्याकडे एकाचवेळी भरण्यासाठी पैसे (Price) नसतील तर काळजी करु नका. एर्टिगाच्या बेस मॉडेल किंवा टॉप सेलिंग मॉडेलला फक्त 2 लाख रुपयांच्या डाऊनपेमेंटसह खरेदी करु शकता.

1. किंमत ८.६९ लाख

मारुती सुझुकी एर्टिगाच्या दोन सीएनजी मॉडेल्ससह एकूण ९ प्रकार आहेत. त्याची एक्स शोरुमची किंमत ८.६९ लाख ते १३.०३ लाख रुपये आहे. या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या MPV मध्ये १४६२ cc चे पेट्रोल (Petrol) इंजिन आहे आणि CNG किटचा पर्याय देखील आहे. मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह एर्टिगासह चांगला केबिन स्पेसह मायलेजमध्येही चांगली आहे.

2. मारुती एर्टिगा LXI

मारुती सुझुकी एर्टिगाच्या बेस मॉडेल Ertiga LXI ऑप्शनलची ऑन रोड किंमत ही 9,68,635 रुपये आहे. जर तुम्ही Ertiga चा बेस मॉडेल २ लाख रुपयांच्या डाउनपेमेंटसह खरेदी करत असाल तर त्याचा व्याजदर ९ टक्के इतका असेल. यासाठी तुम्हाला ७,६८,६३५ रुपयांचे लोन (Loan) घ्यावे लागेल. जर तुम्ही ५ वर्षांसाठी लोन घेत असाल तर प्रत्येक महिन्याला १५,९५६ रुपयांचा EMI हप्ता भरावा लागेल. मारुती Ertiga LXI ऑप्शनल मॅन्युअल पेट्रोल विकत घेतल्यास तुम्हाला ५ वर्षात सुमारे १.९ लाख व्याज भरावे लागेल.

3. मारुती एर्टिगा ZXI

मारुती सुझुकी एर्टिगाच्या ZXI ची सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. या मॉडेलची किंमत १२,५५,२१३ रुपये इतकी आहे. जर तुम्ही मारुती एर्टिगा ZXI २ लाख रुपये डाउनपेमेंटवर खरेदी करत असाल तर त्याचा व्याजदर ९ टक्के इतका भरावा लागेल. यासाठी तुम्हाला १०,५५,२१३ रुपयांचे लोन घ्यावे लागेल. जर तुम्ही ५ वर्षांसाठी लोन घेत असाल तर प्रत्येक महिन्याला २१,९०४ रुपयांचा EMI हप्ता भरावा लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT