Maruti Car Price Saam Tv
लाईफस्टाईल

Maruti Car Price : Maruti चा 'जबरा' झटका; तुमच्या अवाक्यातील 'या' कारच्या किंमतीही वाढल्या

मारुती सुझुकीनं आपल्या कारच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे.

कोमल दामुद्रे

Maruti Car Price : देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी कंपनी मारुती सुझुकीनं (Maruti Suzuki) आपल्या कारच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. कंपनीने यासंबंधी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं आहे. कंपनीच्या सर्व मॉडलच्या कारच्या एक्स शो रूमच्या किंमतीत जवळपास १.१ टक्क्याची वाढ करण्यात आली आहे.

मारुती सुझुकीच्या सर्व मॉडलच्या कारच्या नव्या किंमती वाढीव किंमतींसह आजपासून म्हणजेच १६ जानेवारीपासून लागू होणार आहेत. या वाढत्या किंमती (Price) वेगवेगळ्या मॉडलच्या कारच्या किंमतीनुसार असतील, असंही कंपनीतर्फे (Company) स्पष्ट करण्यात आलं आहे.

मारुती सुझुकीच्या कोणत्या मॉडलच्या कारच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे, हे अद्याप कंपनीतर्फे स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. पण वाढलेल्या किंमती या वेगवेगळ्या मॉडलच्या कारच्या (Car) किंमतीनुसार असतील. सध्या कंपनीच्या सर्वात स्वस्त ऑल्टोपासून ग्रॅंड विटारा यांसारख्या कार लाइनअपमध्ये आहेत. मारुती सुझुकीशिवाय टाटा (Tata) मोटर्स, हुंडई, ऑडी आणि मर्सडिज यांसारख्या कंपन्यांनीही जानेवारीपासून आपल्या कारच्या किंमती वाढवण्याचे निश्चित केले आहे.

Maruti Car Price

इनपुट कॉस्ट वाढल्यामुळे कारच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत, असं काही वाहन कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. ही एक साधारण प्रक्रिया आहे. वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या कारच्या किंमती वाढवतात. याशिवाय सेमिकंडक्टरचा पुरवठा, सप्लाइ चेन आदी वाहनांच्या किंमती वाढण्याची कारणे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT