Benefits of Dried Amla Saam Tv
लाईफस्टाईल

Benefits of Dried Amla : सुकलेल्या आवळ्यात दडलयं आरोग्याच रहस्य...!

Healthy Benefits : सुकवलेल्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात.

कोमल दामुद्रे

Dried Amla Uses : अनेक औषधीय गुणधर्मामध्ये समृध्द असलेला आवळा आरोग्यासाठी अधिक उपयुक्त आहे. त्याचा दैनंदिन जीवनात वापर करुन आरोग्य सुधारता येते. सुकवलेल्या आवळ्यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात.

सुका आवळा खाल्ल्याने आरोग्याशी (Health) संबंधित अनेक समस्या दूर होतील. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. आवळा व्हिटॅमिन (Vitamins)-ए, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी सुक्या आवळ्याचे नियमित सेवन करा.

सुकलेल्या आवळ्याचे आरोग्यासाठी फायदे (Benefits)

1. पोटाशी (Stomach) संबंधित समस्यांसाठी सुका आवळा खूप फायदेशीर आहे. सुकलेल्या आवळ्याचे सेवन केल्याने पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म पोटातील विषारी घटक कमी करण्यास मदत करतात. हे खाल्ल्याने पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.

2. आवळा डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी आवळ्याचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. यात असलेले व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-सी डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. डोळे निरोगी ठेवण्यासाठी आपण नियमित त्याचे सेवन केले पाहिजे.

3. तोंडातून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी सुकलेल्या आवळ्याचे सेवन करणे खूप फायदेशीर असते. सुकलेल्या आवळ्यांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे दुर्गंधी आणणारे बॅक्टेरिया नष्ट करण्यात प्रभावी असतात. यासाठी आवळा चावून खावावा.

4. गरोदरपणात महिलांना अनेकदा उलट्या आणि मळमळ होण्याची समस्या होते. सुकलेल्या आवळ्याच्या सेवनानेही या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी सुकलेला आवळा चावून खाऊ शकता. यामुळे बाळाला पोषणही मिळते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chaitanyanand Swami: विद्यार्थिनींना धमकावून चैतन्यानंद सरस्वतीकडे पाठवायच्या, इन्स्टिट्यूटच्या ३ महिला अधिकाऱ्यांना अटक

Shocking : मोबाईलवर गेम खेळू नको, बहीण ओरडली; रागाच्या भरात भावाचा टोकाचा निर्णय

हैदराबाद विरुद्ध ब्रिटिश गॅझेटियरवरुन वाद?मुंडेंच्या टीकेला जरांगेंचं वादग्रस्त उत्तर

Scholarship: सरकारनं घेतला विद्यार्थ्यांच्या भल्याचा निर्णय; नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळेल दुप्पट शिष्यवृत्ती

दसरा मेळाव्यात आरक्षणाचं शस्त्रं पूजन, हैदराबाद गॅझेटियरला मुंडेंचा विरोध?

SCROLL FOR NEXT