Malaika Arora Diet  google
लाईफस्टाईल

Malaika Arora Diet : फीटनेस फ्रीक मलायका आरोराही खाते 'हा' ठेचा; तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी

Bollywood lifestyle : बॉलिवूडची मलायका फिटनेसच्या बाबतीत चाहत्यांच्या नेहमीच चर्चेत राहत असते. मग ती रोज डाएट करते का? आणि ती कधीच वेगवेगळे पदार्थ खात नाही का? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येत असतो.

Saam Tv

बॉलिवूडची मलायका फिटनेसच्या बाबतीत चाहत्यांच्या नेहमीच चर्चेत राहत असते. ५१ वर्षाची मलायका आत्ताच्या २४-२५ वर्षांच्या मुलींना फिटनेसच्या बाबतीत मागे पाडते. मग ती रोज डाएट करते का? आणि ती कधीच वेगवेगळे पदार्थ खात नाही का? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येत असतो. याचाच विचार करून आम्ही तुमच्यासाठी मलायका अरोराची फेवरेट डिश तोडी प्रोटीन युक्त असा पनीर ठेचा रेसिपी जाणून घेणार आहोत.

पनीर ठेचा रेसिपीचे साहित्य :

६ ते ७ हिरव्या मिरच्या

१० ते १५ लसूण पाकळ्या

जाडं मीठ

३ चमचे शेंगदाणे

कोथिंबीर

२०० ग्रॅम पनीर

अर्ध्या लिंबाचा रस

अर्धा चमचा धणे पावडर

तेल

पनीर ठेचा रेसिपीची कृती :

सर्वप्रथम एका तवा मध्यम आचेवर गरम करून घ्या. आता त्यावर मिरच्या लसून आणि शेंगदाणे व्यवस्थित खरपूस होईपर्यंत परतून घ्या. आता हे साहित्य भाजल्यावर ते थंड होऊ द्या. आता दुसऱ्या बाजूला कोथिंबीर बारिक चिरून घ्या. आता थंड झालेले शेंगदाणे, मिरची आणि लसूण एका मिक्सरमध्ये बारिक करा त्यानंतर त्यात कोथिंबीर मिक्स करून आवश्यकतेनुसार पाणी अ‍ॅड करा आणि ठेच्यासारखी पेस्ट तयार करा.

पनीर आता छान कोट करा

आता तयार झालेला ठेचा एका भाड्यात काढून घ्या. पनीरचे आता चौकोनी तुकडे करून घ्या. त्याला तयार केलेला ठेच्याने कोट करा. हे करत असताना दुसरीकडे तव्यावर तेल पसरवून घ्या आणि कोट केलेले पनीर त्यावर ठेवा. पनीर परतायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे ते सतत उलटे पालटे करून परता आणि गरमा गरम सर्व्ह करा. ही रेसिपी मलायका तिच्या डाएटमध्ये सुद्धा खाते. त्यामुळे तुम्हीही खाद्यप्रेमी असाल तर ही झटपट टेस्टी रेसिपी ट्राय करू शकता.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT