Carrot Soup Saam Tv
लाईफस्टाईल

Carrot Soup : थंडीच्या दिवसात प्या गाजराचे सूप;आरोग्यासाठी ठरेल अत्यंत पौष्टिक, पाहा रेसिपी

थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच चटकदार खाण्याचा मोह झालेला असतो. अशातच गरमागरम सूप भेटलं तर कोणालाही आवडेलच.

कोमल दामुद्रे

Carrot Soup : थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. सर्वात जास्त प्रमाणात लोक गाजराचा हलवा बनवून खाण्यास पसंत करतात. त्याचबरोबर गाजर सॅलड मधून आणि कच्च सुद्धा खाल्ले जाते. अशातच गाजराचा हलवा बनवण्यासाठी भरपूर सामग्री आणि भरपूर वेळही लागतो.

त्याचबरोबर थंडीच्या दिवसात सगळ्यांनाच चटकदार खाण्याचा मोह झालेला असतो. अशातच गरमागरम सूप भेटलं तर कोणालाही आवडेलच. गाजर हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्याचबरोबर गाजर आहे आपल्या शरीराला अनेक प्रकारचा फायदा देते.

गाजरामध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असतात. ज्याच्या सेवनाने तुम्हाला व्हिटॅमिन (Vitamins) ए, सी, के, आयन, पोटॅशियम इत्यादी तत्वे प्राप्त होतात. गाजराचा सूप तुम्ही जेवणाच्या आधी पिऊ शकता. चला तर मग जाणून घेऊ गाजराच सूप कसं बनवायचं.

1. साहित्य :

  • गाजर - 200 ग्रॅम

  • एक बारीक कापलेला कांदा

  • तीन ते चार लसूणच्या पाकळ्या

  • आल्याचा एक तुकडा

  • व्हेजिटेबल ऑइल (Oil)

  • काळी मिरी

  • चवीनुसार मीठ

  • दोन मोठे चमचे क्रीम

  • आवश्यकतेनुसार पाणी

2. कृती

  • सर्वप्रथम गाजर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर गाजरला कुकरमध्ये टाकून त्यात थोडंसं प्यायचं पाणी टाकून उकळवून घ्या.

  • आता गाजर आणि पाणी वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्या.

  • एका मिक्सरमध्ये गाजर टाकून पेस्ट तयार करून घ्या. आता एक पॅन गॅस वरती ठेवा.

  • पॅनमध्ये तेल टाकून कांदा, लसूण, आलं बारीक कापून तेलामध्ये परता. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतावा.

  • आता गाजरची मिक्सरमध्ये केलेली पेस्ट टाकून शिजवून घ्या सूप जास्त घट्ट बनवायचं नाही आहे.

  • तुम्हाला असं वाटत असेल की सूप जास्त घट्ट झाल आहे. तर तुम्ही त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता.

  • आता सूपमध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. एक ते दोन मिनिटे उकळून गॅस बंद करा.

  • आता सूपच्या वरून क्रीम, काळी मिरेपूड टाकून गरमागरम डिनरच्या आधी खाऊन घ्या.

  • गाजरचं सूप चविष्ट तर असेलच त्याचबरोबर तुमच्या आरोग्यासाठी देखील चांगल असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ पैकी ११ आमदार फुटले अन् भाजपात प्रवेश; एकट्या पडलेल्या पक्षाध्यक्षांनी सोडलं मंत्रिपद; राजकारणात खळबळ

Mumbai : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार! तरुणाने गुपचूप महिलांचे व्हिडिओ काढले अन्...

Maharashtra Poltitics: काँग्रेसला चीनकडून पैसा मिळतोय, मुख्यमंत्री फडणवीसांचा खळबळजनक दावा

Cheese Balls Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि चीज भरलेले चीज बॉल्स, वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update: सावंतवाडी शहरात भरवस्तीत रान गव्यांचा कळप आला रस्त्यावर

SCROLL FOR NEXT