Cheese Balls Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि चीज भरलेले चीज बॉल्स, वाचा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

३ ते ४ मध्यम आकाराचे बटाटे, अर्धा कप ब्रेड क्रम्ब्स, २ चमचे कॉर्नफ्लोअर, १०० ग्रॅम मोझरेला किंवा प्रोसेस्ड चीज, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ओरेगॅनो, चवीनुसार मीठ, २ चमचे मैदा तळण्यासाठी तेल, कोटिंगसाठी ब्रेड क्रम्ब्स

Coriander Cheese Ball | GOOGLE

बटाटे उकडून घ्या

सर्वप्रथम ३ ते ४ मध्यम आकाराचे बटाटे कुकरमध्ये उकडून घ्या. बटाटे थंड झाल्यावर त्यांची साल काढून चांगले मॅश करून घ्या. बटाट्यांमध्ये गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.

Cheese Balls Recipe

बटाट्याचे मिश्रण तयार करा

एका भांड्यात मॅश केलेले बटाटे घ्या. त्यात अर्धा कप ब्रेड क्रम्ब्स, २ चमचे कॉर्नफ्लोअर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स आणि थोडे ओरेगॅनो घालून चांगले मिक्स करा.

Cheese Corn Appe Recipe | pinterest

चीजचे छोटे तुकडे करा

आता मोझरेला चीज किंवा प्रोसेस्ड चीजचे छोटे चौकोनी तुकडे करून घ्या. हे चीज बॉल्सच्या आत भरण्यासाठी वापरायचे आहे. यामुळे बॉल्सला छान चीजचा स्वाद येईल.

Cheese Balls Recipe | GOOGLE

चीझ बॉल्स तयार करा

तयार बटाट्याच्या मिश्रणाचा छोटा गोळा हातावर घ्या. तो थोडा चपटा करून त्याच्या मध्यभागी चीजचा तुकडा ठेवा. आता मिश्रणाने चीज पूर्णपणे झाकून गोल आकार द्या.

Cheese Corn Balls | Saam Tv

बॉल्सना कोटिंग करा

एका भांड्यात २ चमचे मैदा आणि थोडे पाणी घालून पातळ मिश्रण तयार करा. दुसऱ्या भांड्यात ब्रेड क्रम्ब्स घ्या. तयार बॉल्स आधी मैद्याच्या मिश्रणात बुडवा आणि नंतर ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून घ्या.

Cheese Corn Appe Recipe | pinterest

चीझ बॉल्स तळून घ्या

कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर त्यात तयार बॉल्स सोडा. मध्यम आचेवर ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर टिश्यू पेपरवर काढा.

Cheese Balls Recipe | yandex

गरमागरम सर्व्ह करा

तयार झालेले गरमागरम चीझ बॉल्स प्लेटमध्ये काढा. त्यावर थोडे चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो भुरभुरवा. टोमॅटो केचप किंवा मेयोनीजसोबत हे कुरकुरीत चीझ बॉल्स सर्व्ह करा.

Cheese Balls Recipe | pinterest

Real vs Fake Honey: तुम्ही खात असलेलं मध शुद्ध आहे की भेसळयुक्त? घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट

Real vs Fake Honey | Saam Tv
येथे क्लिक करा