Homemade Room Freshener  Saam Tv
लाईफस्टाईल

Homemade Room Freshener : घराच्या घरी बनवा 'हे' 5 नैसर्गिक रूम फ्रेशनर, घरातील दुर्गंधी होईल मिनिटांत दूर

How To Create Room Freshener : सध्या एअर फ्रेशनर चा वापर सगळीकडे करताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Room Freshener : सध्या एअर फ्रेशनर चा वापर सगळीकडे करताना दिसत आहे. तसेच आपण देखील पाहुणे घरी येण्या आधी घराचा छान वास येण्यासाठी रूम फ्रेशनर चा वापर करतो. बाजारात अनेक प्रकारचे एअर फ्रेशनर स्प्रे सहज मिळतात.

त्यामध्ये केमिकलचा वापर जास्त प्रमाणात केल्यामुळे आरोग्याला (Health) नुकसान पोहोचू शकते म्हणून आज आम्ही तुम्हाला नैसर्गिकरित्या घरात सुगंध येण्यासाठी सर्वोत्तम उपाय सांगणार आहोत काही मिनिटातच तुमच्या घरात (Home) सुगंध दरवळेन.

कॉफी रूम फ्रेशनर -

कांदा लसूण यासारख्या तिखट वासापासून सुटका मिळवण्यासाठी कॉफीचा वास देखील नैसर्गिक देव म्हणून काम करतो. कचऱ्याचा वास दूर करण्यासाठी कॉफी ग्राउंडला किचनच्या डस्टबिन मध्ये ठेवा. याने वास दूर होण्यास मदत होईल.

बेकिंग सोडा आणि दालचिनी रूम फ्रेशनर -

बेकिंग सोडा आणि दालचिनीचा वापर करून तुम्ही कोणत्याही प्रकारची दुर्गंधी दूर करू शकता. त्यासाठी बेकिंग सोडा आणि दालचिनी वापरून रूम फ्रेशनर तयार करून रोज घरात शिंपडावे लागेल. बेकिंग सोडा आणि दालचिनी पाण्यामध्ये मिक्स करून तसेच तुम्ही दालचिनी आणि संत्रीचे पावडर पाण्यात मिसळून एका स्प्रेच्या बाटलित टाकून याचा वापर करू शकता.

एअर फ्रेशनर जेल -

तुम्हाला बाजारात एअर फ्रेशनर सहज मिळते परंतु सुगंध येण्यासाठी यामध्ये अनेक प्रकारचे रसायनाचा वापर केला जातो. त्यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते.म्हणून घरच्या घरी एअर फ्रेशनर जेल बनवून वापरणे अधिक चांगले आहे. त्यासाठी जेलेटिन, चमेली, तुळशी, एसेन्शियल ऑईल मिसळून याचा वापर करा.

लिंबूवर्गीय फळांपासून रूम फ्रेशनर -

लिंबूवर्गीय फळांचा वापर करून रूम फ्रेशनर बनवू शकता.त्याने बाथरूम आणि स्वयंपाक घरातील दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल.तुम्ही हे घरी सहज बनवू शकता त्यासाठी तुम्हाला वाइल्ड ऑरेंज एसेन्शियल ऑईल आणि लिंबू ची आवश्यकता आहे. या ऑईलचे चार-पाच थेंब पाण्यामध्ये मिसळून एका स्प्रेच्या बाटलीत टाकून पूर्ण घरांमध्ये शिंपडून घरातील दुर्गंधी निघून जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

Shivali Parab : शिवाली परब विठ्ठल नामात दंग, पाहा मनमोहक फोटो

SCROLL FOR NEXT