Amritsari Paneer Tikka Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Amritsari Paneer Tikka Recipe : पार्टीसाठी बनवा परफेक्ट अमृतसरी पनीर टिक्का स्टार्टर, पाहा रेसिपी

Recipe : कोणत्याही पार्टीमध्ये किंवा फंक्शनसाठी पनीर टिक्का हे एक परफेक्ट स्टार्टर असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Paneer Tikka Recipe : कोणत्याही पार्टीमध्ये किंवा फंक्शनसाठी पनीर टिक्का हे एक परफेक्ट स्टार्टर असते. जर तुम्ही घरी छोटीशी पार्टी ऑर्गनाईज करत असाल तर तुम्ही अमृत्सरी पनीर टिक्का स्टार्टरसाठी एकदम मस्त प्लॅन ठरेल.

पनीर (Paneer) टिक्क्याची चव सगळ्यांनाच आवडेल आणि पनीर टिक्का खाणारा माणूस कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. अमृतसरी पनीर टिक्का बनवणे जास्त कठीण नाही आहे. सोबतच पनीर टिक्क्यामध्ये प्रोटीन रिच असते. याचे तिखटपण ओवा आणि बाकीच्या तिखट सामग्रीमुळे वाढते.

तुम्हाला सुद्धा घरी होणाऱ्या पार्टीच्या (Party) मेनूमध्ये अमृतसर पनीर टिक्क्याला सामील करायचं असेल आणि हॉटेल सारखी चव आणायची असेल तर, त्याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे. चला तर मग जाणून घेऊ अमृत्सरी पनीर टिक्क्याची सिम्पल टेक्निक.

अमृतसरी पनीर टिक्का बनवण्याची सामग्री -

पनीरचे 20 ते 25 चौकोनी मोठे मोठे तुकडे, भाजलेले बेसन 1/4 कप, ओवा 1/4 टीस्पून, लाल तिखट 1 टेबल स्पून, अद्रक लसूण पेस्ट 1 टेबल स्पून, चाट मसाला अर्धा टीस्पून, तेल गरजेनुसार, मीठ चवीनुसार

अमृतसर पनीर टिक्का बनवण्याची पद्धत -

  • चवीला उत्कृष्ट असणारा अमृतसरी पनीर टिक्का बनवण्यासाठी सर्वात आधी पनीर घेऊन त्याचे चौकोनी चौकोनी मोठे मोठे तुकडे कापून घ्या.

  • त्यानंतर एक वाटी घेऊन त्यामध्ये भाजलेले बेसन, लाल मिरची पावडर, ओवा, 2 टी स्पून तेल, अद्रक लसूणची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून.

  • चांगल्या प्रकारे मिक्स करा. आता या मिश्रणामध्ये तीन ते चार टेबलस्पून पाणी टाकून अजून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  • आता तयार केलेल्या या मिश्रणमध्ये पनीरचे तुकडे टाकून हलक्या हाताने वर खाली करून मॅरीनेट करायला ठेवा.

  • खोलगट कढईमध्ये तेल टाकून मिडीयम गॅसवर ठेवा. जेव्हा तेल गरम होईल तेव्हा मॅरीनेट केलेले पनीरचे तुकडे डीप फ्राय करून घ्या.

  • पनीरच्या तुकड्यांना पलटून पलटून परतून घ्या. ज्यामुळे ते दोन्ही बाजूंनी तपकिरी होईपर्यंत परतून निघतील.

  • पनीर चांगल्या प्रकारे परतण्यासाठी दोन ते तीन मिनिटे लागतील. त्यानंतर पनीरच्या टिक्क्यांना एका प्लेटमध्ये काढून.

  • अशाप्रकारे सगळे पनीरचे तुकडे तेलामध्ये डीप फ्राय करून घ्या. स्टार्टर साठी टेस्टी अमृत्सरी पनीर टिक्के बनवून तयार आहेत.

  • यांना प्लेटमध्ये ठेवून वरून चाट मसाला टाका. आणि गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Tuesday : अंगारकी चतुर्थीला ४ राशींचे भाग्य उजळणार, वाचा मंगळवारीचे भविष्य

Herbal Tea : सकाळी उठल्यावर प्या 'ही' हर्बल टी, पोटाच्या समस्यांपासून होईल सुटका

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये एकाच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या जेरबंद

Nashik politics : नाशिकमध्ये ४ मंत्री, पण ध्वजारोहणाचा मान जळगावच्या महाजनांना, पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार?

Shocking: DM सोबतच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये अचानक प्ले झाला पॉर्न VIDEO, पाहताच महिला अधिकारी पळून गेल्या

SCROLL FOR NEXT