Dabeli Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Dabeli Recipe : कुरकुरीत आणि मऊ घरच्याघरी बनवा झक्कास दाबेली; वाचा रेसिपी

Dabeli Recipe at Home : पावसाळ्यात भजी ऐवजी तुम्ही घरी कुरकुरीत दाबेली सुद्धा बनवू शकता. ही दाबेली नेमकी कशी बनवायची याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

पावसाळा म्हटलं की आतापर्यंत तुम्ही नाश्त्याला कुरकुरीत आणि मस्त भजी नक्की खाल्ली असेल. मात्र सारखी सारखी भजी खाऊन तुम्हाला देखील आता कंटाळा आला असेल. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळी आणि भन्नाट रेसिपी आणली आहे. पावसाळ्यात भजी ऐवजी तुम्ही घरी कुरकुरीत दाबेली सुद्धा बनवू शकता. ही दाबेली नेमकी कश बनवायची याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

साहित्य

8 पाव

6 चमचे बटर

1/4 कप शेव

1 चमचा लवंग

1 चमचा जिरे

2 बटाटे

कोथिंबीर

1/4 शेंगदाणे

लाल तिखट

मीठ

डाळिंबाचे दाणे

लसूण मिओनिज

बटाटा

धने

लवंग

कृती

सर्वात आधी धने, लवंग, दालचिनी आणि लाल मिरची एका पॅनमध्ये गरम करून घ्या. त्यानंतर दुसरीकडे बटाटे उकडण्यासाठी ठेवा. बटाटे उकडत आहेत तोवर मिरची आणि मसाला छान भाजून त्याची बारीक पूड बनवा. उकडलेले बटाटे आधी थंड हाउद्या. त्यानंतर हाताने त्याची साल काढून मॅश करून घ्या.

सारण बनवण्यासाठी आधी एक कढई घ्या. यामध्ये तेल टाका. तसेच नंतर जिरे टाका. जिरे तडतडले की यात बारीक चिरलेला कांदा टाका. नंतर बारीक केलेले मसाले मिक्स करा आणि बटाटा टाकून घ्या. हे सर्व मिश्रण छान शिजवून घ्या. तसेच आवश्यकतेनुसार यामध्ये मीठ देखील टाकून घ्या.

आता एक तवा घ्या आणि यामध्ये थोडं बटर टाका. बटर मेल्ट झालं की पाव मध्यभागी कट करून दोन्ही बाजूने छान भाजून घ्या. त्यानंतर या पावातील खालच्या बाजूला दाबेलीचे मिश्रण भरून घ्या. मिश्रण भरल्यावर त्यामध्ये शेंगदाणे, कांदा, भाजेलेली डाळ आणि शेव देखील भरा. तसेच पुन्हा एकदा पाव बटर लावून मस्त कडक करून घ्या.

घरच्याघरी तयार झाली कडक दाबेली. ही दाबेली तुम्ही पाऊस सुरू झाला की मस्त खाऊ शकता. याची चव आणखी वाढवायची असेल तर यासोबत थोडा चहा सुद्धा घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

Tamarind Leaf Recipe: चिंचेच्या पानांची अस्सल गावरान भाजी, एकदा नक्की करून बघा

Shoking News : घातपात की आयुष्य संपवलं? बंद घरात सापडले ४ मृतदेह, मृत्यूचं कारण गुलदस्त्यात

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा हा मेळावा | VIDEO

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

SCROLL FOR NEXT