कोमल दामुद्रे
मुंबई ही स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्ही फूड प्रेमी असाल तर या प्रसिद्ध स्थळांना नक्की भेट द्या
घाटकोपरची खाऊ गल्ली खूप प्रसिद्ध आहे. येशील साई स्वाद डोसा, विक्रांत सर्कल, हॉट स्पॉट, पास्ता काउंटर या ठिकाणी खवय्यांसाठी खूप चांगले पर्याय आहेत.
कार्टर रोड खाऊ गल्ली ही गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. या खाऊ गल्लीतील लस्सी,गुलाब जाम,वॉफल्स हे पदार्थ नक्की खाऊन पाहा.
माहिम खाऊ गल्ली ही वेगवेगळ्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथील खिचडा, चिकन तंदुरी, मोमोज, रगडा चाट, कुल्फी फालुदा हे प्रसिद्ध पदार्थ आहेत.
झवेरी बाजार हा दागिण्यांसोबत खाण्यासाठीही प्रसिद्ध आहे. येथील स्ट्रीट स्टाईल पुलाव, वडा पाव, दाबेली, पॅनकेक, कचोरी, समोसा खूप प्रसिद्ध आहे.
चेंबूर खाऊ गल्ली ही प्रादेशिक पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथील डाल पकवान, कुल्चा,रगडा पॅटी असे पदार्थ प्रसिद्ध आहे.
कॉलेजच्या मुलांसाठी सर्वात चांगली जागा म्हणजे मुलुंड खाऊ गल्ली. मुलुंड खाऊ गल्ली ही तवा पुलाव, पाव भाजी, खिचडी, चॉकलेट मिल्कशेकसाठी प्रसिद्ध आहे.
गोड खाणाऱ्यांसाठी चांगला पर्याय म्हणजे प्रिन्सेस स्ट्रीट खाऊ गल्ली. प्रिन्सेस स्ट्रीट खाऊ गल्ली समोसा चाट, बदाम हलवा, आइस्क्रिम चाट, जलेबी रबडीसाठी प्रसिद्ध आहे.
नॉन व्हेज खाणऱ्यांसाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे मोहम्मद खाऊ गल्ली. येथील शोरमा, नान, मालपोहा आणि नॉन व्हेजमध्ये खूप पर्याय उपलब्ध आहेत.
खारघर खाऊ गल्ली चायनीज पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथील फ्राइड राईस, मन्चुरिअन, नुडल्स खूप प्रसिद्ध आहे.
एसएनडीटी खाऊ गल्ली चाट पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक प्रकारचे चाट उपलब्ध असतात.पाव भाजी, चाट, चायनीज असे अनेक पदार्थ येथे येऊन नक्की खा.