Makar Sankranti Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Makar Sankranti Recipe : यंदाच्या मकर संक्रांतीला बनवा तिळाचे स्वादिष्ट नमकीन चाट !

तिळगुळापासून चविष्ट नमकिन पदार्थ कसे बनवायचे याची विधी सांगणार आहोत.

कोमल दामुद्रे

Makar Sankranti Recipe : आपल्या भारतामध्ये मकर संक्रांती हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी आपण 15 जानेवारी 2023 ला येणार आहे. सगळीकडे आनंददायी वातावरण पसरलेलं असेल. अशातच प्रत्येकाच्या घरामध्ये तीळ आणि गुळाचा खमंग वास दरवळत असतो.

त्याचबरोबर बऱ्याच जणांना तिळगुळाचा लाडू कसा बनवावा हे माहीत नसतं. आज आम्ही तुम्हाला तिळगुळापासून चविष्ट नमकिन पदार्थ कसे बनवायचे याची विधी सांगणार आहोत.

मकर संक्रांती (Makar Sankranti) हा सण सगळेजण हसत खेळत हा सण साजरा करतात. त्याचबरोबर मकर संक्रांती हा दिवस आपल्या भारतामध्ये अतिशय शुभ दिवस मानला जातो. त्याचबरोबर प्रत्येकजण आपापल्या घरी तिळाचे लाडू, खिचडी, दहीवडे अशा प्रकारचे अनेक पदार्थ बनवून त्यांचा आस्वाद घेतात.

त्याचबरोबर तिळगुळ दहीवडे यांनी खिचडी हे पदार्थ बनवून खाणे अतिशय मोलाचं आणि आनंदाच्या दिवसाचं प्रतीक मानला जातं. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे ही एक पारंपारिक प्रथा मानली जाते. कारण की, पाच पांडव जेव्हा वनवासास गेले होते. तेव्हा द्रौपदीने त्यांच्यासाठी खिचडी बनवली होती. अशा पद्धतीचे अनेक पौराणिक इतिहास आहेत. त्याचबरोबर तिळगुळ सगळेच बनवतात. पण तिळगुळापासून अनेक चविष्ट नमकीन बनवता येते.

तिळापासून आपण अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकतो. त्याचबरोबर तिळापासून मिठाई देखील बनवल्या जाऊ शकतात. तुम्ही तिळाची टिक्की चाट बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी

टिक्की चाट साहित्य

दोन कप पीठ

एक चमचा तूप

एक कप बेसन

एक उकडलेला बटाटा (Potatoes)

एक कप तीळ

आमचूर पावडर

जीरा पावडर

बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर

थोडंसं तेल

Til Tikki

कृती

  1. सर्वात आधी तुम्हाला गव्हाच आणि बेसनाचे पीठ मिक्स करून घ्यायच आहे.

  2. त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप तीळ, एक उकडलेला बटाटा, हळद (Turmeric), जीरा पावडर, आमचूर पावडर त्याचबरोबर बारीक कापलेली हिरवी मिरची आणि बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घाला.

  3. त्यानंतर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे.

  4. मोहनासाठी एक मोठा चमचा तूप टाकून आवश्यकतेनुसार पाणी (Water) घेऊन पीठ चांगलं मळून घ्या.

  5. त्यानंतर पिठाच्या बारीक चकत्या करा.

  6. त्यानंतर उरलेल्या अर्धा कप तीळ घेऊन तिळाच्या टिक्क्यांना एका बाजूस तीळ लावून व्यवस्थित लाटून घ्या.

  7. असं केल्याने टिक्की तेलाला चिपकून राहील आणि मध्यम गॅसवर टिक्की सोनेरी रंगाची होईपर्यंत चांगली शेकून घ्यायची आहे.

  8. असं केल्याने तुमची टिक्की कुरकुरीत आणि चविष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT